झीनत, परवीन आणि शबाना एकत्र......


 

चित्रस्मृती 

झीनत, परवीन आणि शबाना एकत्र......

एकदा का चित्रपटात भूमिका साकारणे हा 'अनेकदा तरी व्यवसाय ' आणि 'अधूनमधून मानसिक आनंद ' असतो असे मानले की कामे कशी सुरळीतपणे पार पडतात.... शबाना आझमीचेच बघा. खरं तर तिला 'अंकुर '', 'निशांत ', अशा चित्रपटांनी समांतर चित्रपटाची बुध्दिवादी अभिनेत्री अशी ओळख दिली. पण अशा चित्रपटात भूमिका साकारल्याने मिडियात कौतुक कव्हरेज, चित्रपट महोत्सवात हजेरी आणि काही पुरस्कार हेच प्राप्त होईल. 'स्टार अॅक्ट्रेस ' म्हणून जगायचं म्हणजे चकाचक गाडी, नवीन फॅशनचे कपडे , चपला, सौंदर्यलंकार ( आजच्या काळात आयफोन) हे हवेच आणि तो मार्ग मसालेदार मनोरंजक चित्रपटात भूमिका साकारत जातो. पण त्यात किती रमायचे हे समजायला हवे... शबाना आझमीने ते वेळीच ओळखले आणि सी. पी. दीक्षित दिग्दर्शित 'फकीरा '(शशी कपूर नायक), मनमोहन देसाई दिग्दर्शित 'अमर अकबर अॅन्थनी ' ( विनोद खन्ना नायक), प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'ज्वालामुखी ' ( शत्रुघ्न सिन्हा नायक) अशा आणखीन काही  तद्दन व्यावसायिक चित्रपटात भूमिका साकारत साकारत एफ. सी. मेहरा निर्मित आणि उमेश मेहरा दिग्दर्शित 'अशांती ' ( १९८२) पर्यंत प्रवास केला आणि तो पुढेही सुरु ठेवला. मग वेग कमी केला. समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपटात भूमिका साकारणे यात अनेक बाबतीत  फरक आहे. आणि तो समजून उमजून स्वीकारला तरच मार्गक्रमण शक्य आहे. 'अशांती ' स्वीकारेपर्यंत शबाना आझमी त्यात मुरत गेली म्हणूनच तर या चित्रपटात तिने झीनत अमान आणि परवीन बाबी या ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत उत्तम भूमिका साकारली. 'अमर अकबर अॅन्थनी 'त शबाना, ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. vilasrose

      5 वर्षांपूर्वी

    लेख आवडला.दिलीप ठाकूर ABP माझा वाहीनीवर "फ्लँशबँक"या कार्यक्रमात जुन्या हिंदी सिनेमातील गाणी सादर करतात. हा कार्यक्रम मला खूपच आवडतो.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen