राजकारण आपल्या गतीने पुढे जात असताना ते कधी कोणता मार्ग का स्वीकारेल अथवा नाकारेल याचा अंदाज येणे अवघड....  राजकीय पत्रकार/अभ्यासक/विश्लेषक यावर काय ते भाष्य करतील, फोकस टाकतील. पण गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडीत एका चित्रपटाची आठवण नक्कीच येते, तो म्हणजे, सुजाता चित्रचा डी. व्ही. राव निर्मित आणि डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन ' ( १९७९).

चित्रस्मृती 

"सिंहासन " आणि बरेच काही....

राजकारण आपल्या गतीने पुढे जात असताना ते कधी कोणता मार्ग का स्वीकारेल अथवा नाकारेल याचा अंदाज येणे अवघड....  राजकीय पत्रकार/अभ्यासक/विश्लेषक यावर काय ते भाष्य करतील, फोकस टाकतील. पण गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडीत एका चित्रपटाची आठवण नक्कीच येते, तो म्हणजे, सुजाता चित्रचा डी. व्ही. राव निर्मित आणि डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन ' ( १९७९). मराठीतील हा पहिला शंभर टक्के राजकीय चित्रपट मानला जातो. तोपर्यंत अनेक ग्रामीण मराठी चित्रपटात 'पुढारी ' ही व्यक्तिरेखा राजकारणी असे. आणि त्याबद्दल त्या काळातील प्रेक्षकांची कसलीही तक्रार नव्हती. 'सिंहासन ' प्रदर्शित व्हायच्या काळात मराठी चित्रपट बराच पुढे सरकला होता आणि त्यात प्रयोगशीलता येत होती. हा चित्रपट त्याचाच एक भाग होता. अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक ' आणि 'सिंहासन ' या दोन कादंबरीवर आधारित विजय तेंडुलकर यांची पटकथा आणि संवाद यावरचा हा राजकीयपट आहे. तो तेव्हाच्या राज्यातील राजकारणाच्या खूप जवळ जाणारा असा मानले गेले. मराठी माणसाच्या आवडत्या गोष्टीत 'राजकारण ' या विषयाला खूप प्राधान्य आहे. त्यामुळे या चित्रपटाने मराठी रसिकांचे सत्त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रिया

  1. Vineett

      2 वर्षांपूर्वी

    सिंहासन चित्रपट यु ट्यूबवर उपलब्ध आहे https://www.youtube.com/watch?v=OrgzCauBflU https://www.youtube.com/watch?v=YRlUcxBpF3Eवाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.