‘इस रोल के बाद साउथवाले आप को अपना लेंगे’, हे कमल यांचं म्हणणं खरं ठरलं होतं. टिनू बेंगळुरूत एका हॉटेलमध्ये गेले. सर्वजण त्यांच्याकडे डोळे विस्फारून पाहात होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिल मागितलं. तेव्हा हॉटेलमालकानं नकार दिला. म्हणाला, ‘हम आप को दिल दे बैठे हैं, बिल क्या चीज हैं?’ असाच अनुभव त्यांना दक्षिणेत ठिकठिकाणी येऊ लागला. त्यातूनच दक्षिणेतील कलाप्रेम अन् दिलेरीही कळली.हम दिल दे चुके, बिल क्या चीज हैं?
अभिषेक खुळे डॅनी डेंग्झोप्पा यांनी दिग्दर्शक मुकुल आनंद यांना स्पष्ट सांगून टाकलं, ‘सीनच्या वेळेस टिनूनं शिव्या दिल्यात तर मी त्याला मारीन.’ सेटवरची ही खेळीमेळीतली मारहाण असली, तरी सगळे कसलेले अभिनेते होते. त्यामुळे ही बाब गांभीर्यानं घेण्यात आली. मुकुल यांनी टिनू यांना सांगितलं, ‘कृपा करून त्या शेवटच्या सीनमध्ये तोंडातून कुठलीही शिवी काढू नकोस. नाहीतर डॅनी युनिट डोक्यावर घेऊन सीन बिघडवू शकतो.’ टिनू यांनी ते मानलं. कुठल्याही शिवीविना तो सीन पार पडला. मात्र, चित्रपट रीलिज झाला, तेव्हा डॅनीसह अख्खं युनिट आश्चर्यचकीत झालं. रागानं लालबुंद झालेल्या डॅनी यांनी टिनू यांच्याकडे पाहिलं. टिनू यांनी आपल्या खास शैलीत डोळे मिचकावले. नंतर खसखस पिकली, वो बात अलग. ‘अग्निपथ’च्या वेळीचा हा प्रसंग. यातून प्रतीत काय व्हावं? तर अभिनेत्यातला दिग्दर्शक इथं सरस ठरला होता. टिनू आनंद हा एक अफलातून माणूस आहे. उत्तम लेखक आहे, दिग्दर्शक आहे आणि अभिनेताही. यापैकी त्यांच्या नसानसांत सर्वात जास्त भिनला आहे, तो त्यांच्यातील दिग्दर्शक. कुठं काय हवं, ज्यामुळे एखादी कलाकृती उठेल, हे त्या दिग्दर्शकालाच ठाऊक असतं. टिनू यांचं तसंच आहे. म्हणूनच ‘करना तो ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .