आयुष्यमान खुराना : सिक्का चल रहा है बॉस..


आयुष्यमान खुराना : सिक्का चल रहा है बॉस.. आपल्या मुलाला सिनेमात करीअर करायचं आहे म्हटल्यावर आपल्या घरात ज्या काही प्रतिक्रिया येतील त्यापेक्षा अगदी उलट या मुलाच्या बाबत घडलं. बापाने स्वतः च त्याच्या बॅगा घराबाहेर फेकल्या आणि सिनेमात करीअर करण्यासाठी मुंबईला धाडलं. तो मुंबईत आला. मेहनत केली. व्हिडिओ जॉकी म्हणून काम केलं. मग ब्रेक मिळाला त्याचं सोनं केलं आणि जगाला कळलं की विकी डोनर नाही  तर अभिनयातील बाप आलाय. आयुष्यमान खुराना.. आज नाव गाजत आहे .. चमकत आहे. सलग पाच सिनेमे हिट दिले तर अजुन व्हायला हवं खरं तर ? पण हा प्रवास सरळ मार्गावरचा नाही. त्याची कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी वगैरे या लेखाचा उद्देश नाही पण त्याच्या सिने करीअर मधले निर्णय आणि त्याची प्रत्यक्षात मिळालेली पावती हा नक्कीच आहे. 'विकी डोनर' ते आताच आलेला 'बाला' हा प्रवास विलक्षण आहे असं विधान करायला आज नक्कीच हरकत नाही. विकी डोनर ही फिल्म शुजित सरकारला खऱ्या अर्थाने नाव कमवून देणारी फिल्म होती. स्पर्म डोनेशन सारखा वाच्यता न करणाऱ्या विषयावर दुसरीच फिल्म बनवणं हे विलक्षण धाडसी साहस त्याने लीलया पेललं याही पेक्षा आयुष्यमान सारखा हिरा दिला हे जास्त अधोरेखित करायला हवं. कारण हवं असेल तर काही महिन्यापूर्वी आलेल्या ' आर्टिकल १५ ' या सिनेमातला आयुष्यमान बघितला पाहिजे. त्याचा अभिनय सुधारला आहे अस काही समीक्षकांच्या कंपुच विधान असलं तरीही त्याच्या अभिनयाची रेंज काय आहे सुजाण प्रेक्षक जाणून आहेत. 'विकी डोनर' मधला टिपिकल तरुण मनमौजी मुलगा, नंतर 'दम लगा' के मधला प्रेम, 'अंधाधून' मधला पियानिस्ट, अगदी अलीकडे आलेला 'ड्रीम गर्ल' मधला त्याचा अभिनय बघता त्याची रेंज न काळण्या इतुका भारतीय प्रेक्षक सुजाण नाही हे विधान अत्यंत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


व्यक्ती विशेष

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen