बुरख्याआडची_लिपस्टीक


या सिनेमाला सांगायचय काय तर स्त्रियांसाठी समाजाने आखून दिलेले आदर्श नियम पाळताना जेव्हा त्यांची घुसमट होते तेव्हा फक्त आणि फक्त स्फोट होऊ शकतो. जो या चारही बायकांच्या आयुष्यात होतो आणि सरतेशेवटी एका समान धाग्याला येऊन मिळतो.

बुरख्याआडची_लिपस्टीक

  काय आहे या सिनेमात ? किंवा मग काय वेगळं आहे या सिनेमात ? तर पिवळ्या कव्हरचं असावं तसलं एक पुस्तक या सिनेमातलं एक पात्र वाचत असतं . त्या पुस्तकाची नायिका असते रोझी . आणि ते पुस्तक वाचत असते पंचावन्न वयाची एक विधवा , जी विधवा झाली असली तरीही तिची शारीरिक भूक शाबूत असते. आणि जगाच्या दृष्टीने पातक असलेली ही गोष्ट सिनेमाच्या शेवटी उघडकीला येते. लीला नावाचं आणखी एक पात्र यात आहे. वय साधारण पंचवीस . लग्न ठरलय तिचं पण गल्लीतल्या फोटोग्राफरशी आधीच सूत जुळवलय तिने . त्यामुळे तिची होणारी द्विधा यात आहे. या लीलेच्या दारूड्या बापाने खूप कर्ज करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तिची आई एका कला महाविद्यालयात चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी न्यूड  मॉडेलचं काम करते आहे आणि त्यासंदर्भात लिले ची तिच्या आईशी होणारी शाब्दिक चकमक मनाला चटका लावणारी आहे. कोंकोणा सेन शर्माची एक मुस्लिम हाऊसवाईफही आहे जिची कथा या सगळ्याला समांतर जात असते . नवरा पोरांमागून पोरं तिच्या गळ्यात बांधतो आणि कमाई शून्य . मग ती बुरखा घालून घराबाहेर पडते आणि एका कंपनीची टॉपची सेल्सगर्ल होते . अर्थातच कर्मठ नवऱ्याचा याला विरोध होतो. चौथं पात्र आहे एक कॉलेजगोईंग मुस्लिम गर्ल. वय अठरा एकोणीस. वडिलांचा बुरखे शिवून द्यायचा व्यवसाय . पण वयानुरूप उसळणाऱ्या तिच्या मानसिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक गरजा  बुर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद , स्त्री विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen