२००४ साली गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी हा महोत्सव मोठ्या हिकमतीने गोव्याकडे खेचून आणला ,त्यासाठी अद्ययावत चित्रपटगृह आणि इतर पायाभूत सुविधा युद्धपातळीवर उभारल्या आणि शिस्तबद्ध नियोजनातून पहिला चित्रपट महोत्सव यशस्वी करून दाखवला. या वर्षी त्यांची अनुपस्थिती मनाला चटका लावत राहीली . गोमंतभूमी हे अनेक कलांचे समृद्ध माहेरघर , गेली तब्बल पंधरा वर्षे ‘इफ्फी’ इथे स्थिरावला आहे तरी गोव्यात चित्रपटव्यवसायाचे स्वरूप फारसे विकसित झालेले दिसत नव्हते . ‘इफ्फी’ मध्येही त्यांचे प्रतिबिंब उमटत नव्हते म्हणून एक नाराजीचा सूर जाणवत राहिला होता . पण या वर्षी मात्र 'द गोवन स्टोरी' या खास विभागाची योजना करून गोव्यात निर्माण झालेल्या पारितोषिकप्राप्त कोकणी चित्रपटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले गेले .सुवर्णमहोत्सवी वर्षात 'इफ्फी 'मध्ये चित्रानुभवांची लयलूट
भारतीय चित्रपटजगतात मानाचे स्थान मिळवलेल्या ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा ‘इफ्फी’ ची सुरूवात २० नोव्हेंबरला मोठ्या थाटामाटात झाली . या वर्षीच्या महोत्सवात ‘ इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ‘ विभाग ,'वर्ल्ड पॅनोरामा ', 'सोल ऑफ आशिया ' ,' इंडियन पॅनोरामा ' , देशोदेशींच्या चित्रपटमहोत्सवांमध्ये गाजलेल्या चित्रपटांचा 'फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप ' , डॉक्युमेंट्रीज ,शॉर्टफिल्म ,ऍनिमेशन असे वेगवेगळे विभाग , शिवाय दिग्गज चित्रकर्मीच्या चित्रपटांचे पुनरावलोकन घडवणारा ' रिट्रोस्पेक्टिव्ह ', चित्रपटक्षेत्रात नवनवे प्रयोग करणाऱ्या देशावर 'कंट्री फोकस' , चित्रपटाच्या तांत्रिक अंगांबद्दल वैविध्यपूर्ण चर्चासत्रे आणि कार्यशाळ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
bookworm
6 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण लेख!