चित्रस्मृती


चित्रस्मृती

दिलीपकुमार आणि नूतनचा हा चित्रपट दुर्लक्षित राहिलाय, पण तरी त्याची माहिती तर असावी.....

दिलीपकुमार आणि नूतनचा "कानून  अपना अपना "

आज वयाच्या सत्तरीच्या आसपास अथवा पलिकडे असलेल्या चित्रपट रसिकांना तुम्ही गप्पांच्या ओघात जर विचाराल, दिलीपकुमार आणि नूतन यांनी एकत्र भूमिका केलेला चित्रपट कोणता?      यावर जराही वेळ न दवडता ते पटकन उत्तर देतील, एकही नाही.... त्यातील चिकित्सक असे चित्रपट संग्राहक सांगतील, नरेश सैगल दिग्दर्शित 'शिकवा ' या चित्रपटात ते एकत्र आले होते पण तो चित्रपट मध्येच बंद पडला, त्यामुळे या दोघांना एकत्रपणे पडद्यावर पाहण्याचा योग हुकला हो. नूतनने राज कपूर आणि देव आनंदची नायिका साकारलीय, तेवढा दिलीपकुमारसोबतचा योग आला असता तर बरे झाले असते.... तरीही एकजण सांगेलच, ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला अशाच मध्येच बंद पडलेल्या चित्रपटातील काही तुकडे अथवा दृश्यांना साकारलेला 'फिल्म ही फिल्म ' हा चित्रपट आला होता, त्यात या 'शिकवा 'मधील दिलीपकुमार आणि नूतनची दृश्ये पाह्यला मिळाली. नूतन कुठेही दिलीपकुमारसमोर कमी पडली नाही.... असो. दिलीपकुमार आणि नूतन जोडीच्या चित्रपटाचा विषय निघाला रे निघाला की हेच उत्तर मिळतेय. का माहितेय? याचे कारण म्हणजे, चित्रपटाचा सुवर्णकाळ हा फक्त आणि फक्त १९६०... फार तर १९६५ अथवा 'गाईड 'पर्यन्तच होता, त्यापुढे अथवा त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत काय काय घडले, किती वळणे आली याच्याशी काहीही घेणेदेणे नसणारा खूप मोठा रसिकवर्ग आहे. तो 'फ्लॅशबॅक'मध्येच रमलाय. खरं तर दिलीपकुमार आणि नूतन एक नव्हे तर दोन चित्रपटात एकत्र आले आहेत. त्या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. manisha.kale

      5 वर्षांपूर्वी

    Chan.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen