सरोज खान


निर्मला नागपाल उर्फ सरोज खानचे पालक पूर्वी पाकिस्तानात रहात होते. वडिलांचा मोठा बिझिनेस होता पण १९४७ मधे देश स्वतंत्र झाल्यावर फाळणीमुळे सर्व सोडून भारतात आले ते अगदी निर्वासित बनून! १९४८ मधे छोट्या सरोजचा जन्म झाला. ते माहिमला P W D चाळीत एका छोट्या खोलीत रहात होते. घरची इतकी गरीबी कि कित्येकदा उपाशीपोटी झोपायची वेळ येई अशा वेळी शेजारचा भजी विकणारा ठेलेवाला उरलेली भजी आणि पाव आणून देत असे. आईला संकोच वाटे ती नाही म्हणे पण तो भला माणूस म्हणे, माई बच्चोंने क्या बिगाडा है!  कम से कम उन्हे तो भूखेपेट मत सोने दो! एक तीन साडेतीन वर्षाची मुलगी! रोज भिंतीवर आपली सावली पाहून नृत्त्याचे हावभाव करायची. आईला तीचा हा वेडेपणा वाटे. हे रोजचं होऊ लागल्यावर तिला तिची काळजी वाटू लागली म्हणून ती तिला डॉक्टर कडे घेउन गेली असता त्यांनी ओळखले.  ह्या मुलीला नृत्याची आवड आहे. डॉक्टरांना घरची सगळी परिस्थिती माहित होती. त्यानी आईला सल्ला दिला कि मुलीला बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टित काम बघा. तुम्ही निर्वासित आहात आणि पैशाची गरजही आहे. यामुळे चार पैसेही मिळतील. आई म्हणाली आमची तिथे काहीच ओळख नाही. डॉक्टर चित्रपट सृष्टीतल्या बर्याच जणांना ओळखत होते त्यामुळे अनेक वेळा बालकलाकार ओळखीचे आहे कां अशी त्यांच्याकडे विचारणा होई. त्यामुळे त्यांनी तसे आश्वासन दिले आणि लवकरच तिला तशी संधी पण मिळाली. ती छोटी मुलगी म्हणजे आजची सुप्रसिध्द डान्स कोरिओग्राफर सरोज खान आणि चित्रपट होता "नजराना" ज्यात तिने श्यामा ह्या नायिकेच्या बाल पणीची भूमिका केली होती. निर्मला नागपाल उर्फ सरोज खानचे पालक पूर्वी पाकिस्तानात रहात होते. वडिलांचा मोठा बिझिनेस होता पण १९४७ मधे देश स्वतंत्र झाल्यावर फाळणीमुळे सर्व सोडून भ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. gadiyarabhay

      2 वर्षांपूर्वी

    छान माहिती पण फोटो पहा लिहिलेला फोटो कुठे आहे

  2. Mannishalohokare

      2 वर्षांपूर्वी

    ग्रेट , मरगळ घालवणारावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen