सिनेमाविश्वाची अनोखी सफर !


मीडिया स्टुडंट्सनी स्टडी टूरच्या नावावर चालणाऱ्या छाछुगिरी ऐवजी इथे भेट द्यावी, नोट्स काढाव्यात, डाॅक्युमेंटरी कराव्यात. यावर लिहावं. हे संग्रहालय सिनेमाचा लाईव्ह डेमो आहे. सिनेमाचा पुरेपूर अभ्यास इथं होऊ शकतो. इथे पिकनिकसाठी येऊ नये, समृद्ध होण्यासाठी यावं.

सिनेमाविश्वाची अनोखी सफर !

पेडर रोड, कंबाला हिल्स, नेपियन सी रोड ही नावं उच्चारली तरी आपल्या मनावर दडपण येतं. मुंबानगरीतील हा अप्पर एलिट्सचा भाग. या भागात कोणी नातेवाईक राहण्याचा भाग्योदय आपल्या नशिबी नाही. पण या भागात जाऊन ‘सिनेमा समृद्ध’ होण्याची सुवर्णसंधी आपल्याकडे आहे आणि तेही नाममात्र किमतीत. ‘नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा’ या वास्तूला भेट देणं सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. फिल्म्स डिव्हिजन या सरकारी विभागाने सिनेमा अभ्यासक, माध्यमकर्मी, सिनेमाशी संलग्न क्षेत्रातील व्यक्ती तसंच सिनेमाप्रेमींसाठी दोन देखण्या वास्तूंमध्ये भारतीय सिनेमाचा गौरवशाली इतिहास चोखंदळपणे मांडला आहे. लाल फितीचा कारभार या संकल्पेनला हे संग्रहालय अपवाद आहे. काही शे-कोटी रुपये खर्चून, सर्वसमावेशक विचार करून या संग्रहालयाची निर्मिती झाली आहे. पीरभॉय खालकादिना या गुजराती उद्योगपतींचा 'गुलशन महल' सी फेसिंग बंगला फिल्म्स डिव्हिजनने घेतला. समुद्राची गाज ऐकणाऱ्या या सुंदर वास्तूमध्ये भारतात सिनेमाचं बीज रोवण्याच्या कालखंडाची मांडणी केली आहे. ल्युमिरी ब्रदर्स, पहिल्या सिनेमाचा शो, दादासाहेब फाळकेंचं योगदान, राजा हरिश्चंद्र चित्रपट पाहायला मिळतं. दुर्मीळ आणि ऐतिहासिक दस्ताऐवजांच्या बाबतीत फिल्म्स डिव्हिजन खाण आहे असं म्हटलं जातं. हे संग्रहालय पाहताना त्याचा प्र ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


शिक्षण , संस्था परिचय , चित्रपट

प्रतिक्रिया

  1. vilasrose

      2 वर्षांपूर्वी

    लेख आवडला.माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.