चित्रस्मृती 


चित्रस्मृती 

'शोले ' बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे ( फक्त)

'शोले 'च्या वेळेस मिनर्व्हा थिएटरमध्ये तिकीट दर ते किती होते असा अनेक जण प्रश्न करतात. स्वाभाविकच आहे ते. एक तर तो सर्वकालीन बहुचर्चित चित्रपट आणि आजही कुठे एखाद्या गावात टाकीवर चढून कोणी उडी मारण्याची धमकी देतो अथवा राजकारणात एकादी उपमा द्यायची असेल तर हमखास 'शोले 'चेच प्रसंग आठवतात. रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही हे संदर्भ उपयुक्त ठरताहेत यात बरेच काही येते. त्यामुळे तेव्हा तिकीट दर ते किती होते याबाबत कुतूहल हवेच. त्यात मी गिरगावकर आणि त्या काळात मेट्रोपासून मराठा मंदिर थिएटरपर्यंतचा एरिया म्हणजे मेन थिएटरचे विश्व. असंख्य चित्रपट येथे ज्युबिली हिट झाले. पंचवीस/पन्नास/शंभर आठवडे चाललेत.... 'शोले 'साठी मिनर्व्हा थिएटरमध्ये अप्पर स्टाॅल चार रुपये चाळीस पैसे आणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असे तिकीट दर होते. ( सोबतचे तिकीट बघा). मिनर्व्हात 'शोले ' दिवसा तीन खेळ याप्रमाणे १५ ऑगस्ट १९७५ ते ३१ ऑगस्ट १९७८ असा आणि त्यानंतर तेथेच आणखीन दोन वर्षे, म्हणजे एकूण पाच वर्षे चालला. या काळात हे दर होते. आज हे तिकीट दर चिल्लर वाटतात पण तेव्हा ते महाग होते. याचे कारण म्हणजे ताडदेवच्या सुपर  टाॅकीज ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen