साऊथ कोरियाच्या बॉन्ग जून हो या दिग्दर्शका पॅरेसाईट हा चित्रपट २०१९ ची सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरला आहे. कान महोत्सवातील पाम ओ'डोर पुरस्कार मिळवलेला पॅरेसाईट येत्या ऑस्कर मधील विदेशी चित्रपटाच्या पुरस्काराचा दावेदार समजला जातोय. पॅरेसाईट चित्रपटाचा डॉ.निर्मोही फडकेंनी लिहिलेला रसास्वाद.
पॅरासाईट -- 'माणसाला सुगंध भोवतालाचा'_.
'फुलाला सुगंध मातीचा' या धर्तीवर 'माणसाला सुगंध भोवतालाचा' असं म्हणावं का? कोरियन चित्रपट 'पॅरासाईट' बघून असंच मनात आलं. तसं पाहिलं तर समाजातला निम्न स्तर आणि अतिउच्च स्तर यांच्यामधील दरी आणि छुपं वैमनस्य ही तशी सरधोपट स्टोरीलाईन किंवा कथासूत्र, पण त्यांचे छेद एकमेकांना अगदी अलगदपणे देत हे कथानक एका अशा टप्प्यावर येतं की, तोपर्यंत काहीसा हलकाफुलका, नेहमीचा वाटणारा हा विषय भयकथेकडे आपल्याला वळवतो. चित्रपटाचा आलेख अचानक उलटीसुलटी वळणं घेत प्रेक्षकांना विचार करायलाही उसंत देत नाही. ठरावीक चौकटीतील प्रेमकथा, भयकथा, सूडकथा, वास्तवकथा इ. न राहता हे कथानक नाटकासारखं आपल्यासमोर घडत जातं. एक गर्भश्रीमंत कुटुंब, त्यातील लहान मुलाची आणि महाविद्यालयीन मुलीची शिकवणी घेण्याकरता रुजू झालेले दोघं गरीब पण हुशार बहीण-भाऊ, त्यांनी युक्तीने आपल्या आई-वडिलांनाही केअरटेकर व ड्रायव्हर म्हणून त्या घरात आणणं, चौघांनीही आपलं नातं लपवणं, मालकिणीचा स्वतःच्या घराबद्दलचा अतिकाळजीवाहू स्वभाव, मालकाचं कुटुंब बाहेरगावी गेल्यावर या चौघांनीही त्या घरात एका रात्री चैन करणं अशा नोटवर पूर्वार्ध पोहोचतो. वाटतं आता मालक नि त्याचं कुटुंब लवकरच येईल नि यांची धमाल उडवेल. तसंच होतं पण उडणारी धमाल प्रेक्षकांच् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .