आम्ही बदलतोय 'रूप'


नमस्कार, गेले वर्षभर आपण सिनेमॅजिकमध्ये चित्रपटविषयक विविध प्रकृतीचे लेख वाचत आला आहात. त्यावर प्रतिक्रियाही देत आला आहात. बहुविधच्या विविध व्यासपीठांवरील लेखांचे वाचक समृद्ध आणि संपन्न वाचन संस्कृतीचे पाईक असल्याचे लक्षात घेऊन सिनेमॅजिकच्या स्वरूपात आम्ही लवकरच बदल करत आहोत. प्रभात चित्रमंडळ या अनुभवी आणि चित्रपटांच्या अभ्यासकांनी चालवलेल्या संस्थेचे 'वास्तव रूपवाणाी' हे चित्रपटविषयक नियतकालिक याच ठिकाणाी देणार आहोत. त्यामुळे लवकरच सिनेमॅजिकचे नामकरण 'वास्तव रूपवाणी' असे होणार आहे. सिनेमॅजिकचे सदस्य आणि ज्यांना 'सर्व' या विभागांतर्गत सिनेमॅजिकचे लेख/व्हीडिओ मिळत होते त्यांना आता ते 'वास्तव रूपवाणी' या विभागात प्राप्त होत राहतील. या नव्या स्वरुपाची झलक आज प्रसिद्ध झालेल्या अभिजीत देशपांडे यांच्या लेखातून आमच्या सदस्यांना झाली असेलच. नव्या वर्षातील या नव्या स्वरुपाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागत असेल. धन्यवाद.                                                                       ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.