भारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप


       भारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप

  •   प्रा. अभिजित देशपांडे
मे १९१२ मध्ये दादासाहेब तोरण्यांचा भक्त पुंडलिक आणि मे १९१३ मध्ये दादासाहेब फाळक्यांचा राजा हरिश्चंद्र या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा पाया रचला. मागील १०७ वर्षांत भारतीय चित्रपट विलक्षण विस्तारला आहे. आजमितीला भारत हा जगात सर्वाधिक चित्रपट  बनविणारा आणि चित्रपट पाहणारा देश आहे.  भारत हा एक व्यामिश्र संस्कृती असलेला देश आहे. आणि म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टी ही संकल्पना देखील तशीच व्यापक आणि गुंतागुंतीची होऊन बसते. National Cinema ही संकल्पना Film Studies मध्ये तुलनेने अगदी अलिकडची. १९८० च्या दशकात वापरली जाऊ लागली. तोवर World Cinema ही संकल्पना अधिक ठळकपणे प्रचलित होती. त्याचा वास्तविक अर्थ जगभरचा, विविध देशांमधला सिनेमा. पण हॉलिवूडबाहेरचा सिनेमा याच मर्यादित अर्थाने National Cinema ही संकल्पना वापरली जात होती. १९८९ मध्ये Andrew Higson यांनी National Cinema या संकल्पनेचा स्वतंत्रपणे विचार आरंभला. त्या त्या देशातले सिनेमाचे स्वतंत्र अर्थकारण, इतिहास,सिनेमा संस्कृती, सिनेमातील प्रवाह, सिनेमाच्या जातकुळी व शैली, सिनेमाची संस्कृतिविशिष्ट आशय-विषय दृष्टी,  लोकांच्या सिनेमाकडून अपेक्षा आणि त्यांची सिनेमाची अनुभव घेण्याची संस्कृतिविशिष्ट पद्धती....थोडक्यात, सिनेमाकर्मी, सिनेमा आणि प्रेक्षक या सर्वांतून प्रतीत होणारे त्या देशाचे चरित्र आणि चारित्र्य यांना व्यापणारी ही संकल्पना आहे. Higson यांच्याच शब्दांत सांगायचे तर, “A Nation does not express itself through Culture; it is Culture that produce the Nation.” जिथे जिथे म्हणून चित्रपटसंस ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen