चित्रपट संगीताचे जतन


भारतातील फिल्म सोसायटी चळवळीच्या फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया या  शिखर संस्थेच्या कार्याला साठ वर्षं पूर्ण होत असताना तिच्या कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने दिल्लीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे निमित्त साधून चित्रपट संगीताचे जतन या विषयावर एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचा घेतलेला आढावा.

चित्रपट संगीताचे जतन

                                                  -संतोष पाठारे

                उच्च अभिरुचीचा प्रेक्षक निर्माण करणा-या फिल्म सोसायट्यांना एका छताखाली आणून ती चळवळ देशव्यापी करण्याच्या सत्यजित राय यांच्या प्रयत्नाला २०१९ या वर्षी साठ वर्षं पूर्ण झाली. १९५९ साली स्थापन झालेल्या फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या शिखर संस्थेने आजवर जागतिक दर्जाचे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचणे, चित्रपटाच्या समीक्षेवर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करणे, चित्रपटकर्ते व प्रेक्षक यांच्यामध्ये ओपन फोरमच्या माध्यमातून संवाद घडवून आणणे, चित्रपट रसास्वादाची शिबिरे आयोजित करणे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणे यासारखे विविध उपक्रम आयोजित केले आहेत. या कार्यात चित्रपटरसिक असलेल्या कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे आहे. फेडरेशनच्या कार्याला साठ वर्षं पूर्ण होत असताना आपल्या कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने दिल्लीत ऑगस्ट महिन्यात होणा-या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे निमित्त साधून एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटातील संगीताचे जतन करण्यातील अडचणी (Problematics of Archiving Music i ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद , संगीत रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen