संपादकीय


प्रभात चित्र मंडळातर्फे गेली २७ वर्षे प्रकाशित होणारे चित्रपटांचा, अभ्यासपूर्ण आढावा घेणारे मराठीतील एकमेव त्रेैमासिक वास्तव रुपवाणी आता डिजिटल रुपात बहुविध.कॉम वर प्रसिद्ध होत आहे. जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २०२० च्या अंकातील संपादकीय .

संपादकीय

नवीन वर्षानिमित्त ‘वास्तव रूपवाणी’च्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा! ऑक्टोबर ते मार्च हा मोसम चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणीचा असतो. भारतात आयोजित केले जाणारे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, त्यात दाखवल्या गेलेल्या महत्त्वाच्या चित्रपटांची चर्चा आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीस जाहीर होणारे ऑस्कर पुरस्कार यामुळे चित्रपट वर्तुळात उत्साही वातावरण असतं. पूर्वी केवळ महोत्सवांपुरते मर्यादित असलेले चित्रपट नेटफ्लिक्स व इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध होत असल्यामुळे आणि मल्टिप्लेक्स मध्ये प्रदर्शित होत असल्यामुळे सर्वसामान्य चित्रपट रसिकांना ते पाहणं शक्य झालं आहे. या चित्रपटांची समीक्षकांनी लिहिलेली परीक्षणं आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. यातूनच एखाद्या चित्रपटाची हवा निर्माण होते. तो पाहण्याची उत्सुकता वाढते. ऑस्कर स्पर्धेत हा चित्रपट किती पुरस्कार पटकावणार याबद्दल चर्चा घडतात. ‘पॅरासाईट’ हा चित्रपट या वर्षी चर्चेच्या केन्द्रस्थानी होता. हॉलीवूडमध्ये निर्मिती झालेल्या ‘जोकर’, ‘१९१७’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड’, ‘आयरीश मॅन’, ‘मॅरेज स्टोरी’ यासारख्या चित्रपटांना पिछाडीवर टाकून सर्वप्रथमच परदेशात निर्माण झालेल्या ‘पॅरासाईट’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट व आंतरराष्ट्रीय चित्रपट या पुरस्कारांसह चार ऑस्कर पुरस्कार पटकवण्याचा विक्रम के ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


रुपवाणी- संपादकीय

प्रतिक्रिया

  1. asmitaphadke

      5 वर्षांपूर्वी

    OMG ! Didn't know that there is a magazine like this !!! Awaiting for the articles.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen