पॅरासाईट:क्षुल्लक माणसांचा नश्वर वास


पॅरासाईट हा चित्रपट पहायला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधे तुफान गर्दी उसळली होती. मागच्या वर्षी कान महोत्सवात उत्कृष्ट फिल्मसाठी पाम दि ओर मिळवणारी आणि जगभरात चर्चिली गेलेली दक्षिण कोरियाची ‘पॅरासाईट’ ही फिल्म पिफच्या रसिक प्रेक्षकांसाठी आकर्षण होती यात नवल नाही. रांग इतकी लांब होती की, बरेच लोक परत गेले. शेवटच्या थराला तुम्ही कुठेही असलात तरी कमीच मिळतं किंवा मग तुम्हाला मिळतंच नाही. हा जगाचा नियम आहे. पॅरासाईट अशा शेवटच्या थरातल्या माणसांविषयी काही सांगतो.  

पॅरासाईट:

क्षुल्लक माणसांचा नश्वर वास

-जुई कुलकर्णी

पॅरासाईट हा चित्रपट पहायला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधे तुफान गर्दी उसळली होती. मागच्या वर्षी कान महोत्सवात उत्कृष्ट फिल्मसाठी पाम दि ओर मिळवणारी आणि जगभरात चर्चिली गेलेली दक्षिण कोरियाची ‘पॅरासाईट’ ही फिल्म पिफच्या रसिक प्रेक्षकांसाठी आकर्षण होती यात नवल नाही. रांग इतकी लांब होती की, बरेच लोक परत गेले. शेवटच्या थराला तुम्ही कुठेही असलात तरी कमीच मिळतं किंवा मग तुम्हाला मिळतंच नाही. हा जगाचा नियम आहे. पॅरासाईट अशा शेवटच्या थरातल्या माणसांविषयी काही सांगतो. ‘कार्ल माक्र्सनंतर बाँग जून हो!’ अशी प्रतिक्रिया मी एका इंटरनेट रिव्ह्यूत वाचली आणि स्तिमित झाले. मग अगदी जाणवलं की, खरंच पॅरासाईट हा चित्रपट म्हणजे भांडवलशाहीवर मारलेला जोरदार फटका आहे. पहिल्यांदा हा चित्रपट म्हणजे हसत हसत मारलेला गुद्दा वाटतो आणि तो तर जीवघेणा वार होता हे कळतं तोवर सिनेमा संपलेला असतो. एका कुटुंबाकडे सगळंच काही अमाप आहे. एका कुटु ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      9 महिन्यांपूर्वी

    Oscar winner असलेला हा चित्रपट आजच पाहिला. चित्रपट ठीक आहे.. एक वेगळे कथानक आहे इतकंच.. सर्वांचाच अभिनय उत्तम आहे. पण...... वरील परीक्षणात जरा भडक वर्णन केलं आहे असं मला वाटतं.. उदा.. “पण अजून तरी गरीबांना बुद्धिमत्तेची काही कमी नाही. ‘There is a room at the top’ असं म्हणतात.” चित्रपटाच्या संदर्भात हे म्हणणे साफ चुकीचे आहे... की-वू हा तरुण मुलगा, की-जुंग ही तरुण मुलगी, की- ताएक हा बाप आणि चुंग-सूक ही आई, हे गरीब जरूर आहेत.. पण अट्टल Criminal minded आहेत... परिस्थितीने गांजलेले.. गरीब बिच्चारे .. मुळीच नाहीत... ज्या तऱ्हेने पार्क सारख्या सरळ स्वभावाच्या उद्योगपतीला सहजपणे फसवून त्याच्या घरात अख्खे कुटुंब नोकरी मिळवते , ते म्हणजे बदमाशीचा उत्कृष्ट नमुना आहे... त्यांच्याविषयी जराही सहानुभूती वाटत नाही.. या गरीब लोकांची बुद्धिमत्ता ही गुन्हेगारांची बुद्धीमत्ता आहे... गुन्हा करायला अक्कल लागतेच... परीक्षणात म्हटले आहे : “अभिनय सगळेच उत्कृष्ट करतात पण मठ्ठ सुंदर गृहिणी झालेली चो यो जुंग विशेष लक्षात राहते. या पात्रात काहीच गुण नाहीत. ती सुंदर आहे इतकंच. तिला घर नीट सांभाळता येत नाही. स्वयंपाक करता येत नाही. मुलांना वळणही लावता येत नाही. अमेरिकेचं तिला प्रचंड आकर्षण आहे. तिचा नवरा हुशार बिझनेसमन आहे. तो अगदी चतुर आहे. तो वाईट किंवा दुष्ट माणूस नाही, पण खालच्या वर्गातल्या माणसांविषयी त्याला किळस वाटते.” हे देखील चुकीचे आहे... चो यो जुंग ला मठ्ठ म्हणायचे तर ९९% स्त्रियांना मठ्ठ म्हणावे लागेल.. ती बिचारी साधी सरळ, आपला संसार हेच विश्व समजणारी संसारीक स्त्री आहे..तिच्या या साधेपणाचा हे बदमाश कुटुंब फार फायदा उठवतात.. तिच्या नवऱ्याला खालच्या माणसांबद्दल किळस आहे असे कुठेही जाणवत नाही.. हे चार भिकारडे नोकरी तर मिळवतात, पण त्या तळघरातील कबाडखान्यात राहिल्याने त्यांच्या कपड्यांना कुबट वास येत असे त्यावर इलाज करायचे त्यांना सुचत नाही.. अतिशय घृणास्पद कृत्य करून मुलगी आपल्या बापाला ड्रायवरची नोकरी मिळवून देते.. तेव्हा मालक फक्त एवढंच म्हणतो, गाडीत हा कुबट वास कसला येतोय... आता याला “खालच्या वर्गातल्या माणसांविषयी त्याला किळस वाटते” असं म्हणणे मूर्खपणाचे आहे.. “तुम्ही तुमच्या हाताखालच्या नोकरांशी कसे वागता हे नीट निरखून पहा, त्यांच्याविषयी तुम्हाला किळस वाटते का, याचा कधीतरी विचार करायला हवा. पॅरासाईट हा चित्रपट एक प्रकारे भांडवलशाहीवरचा हल्ला आहे. पण या हल्ल्याची पद्धत भलतीच विलक्षण आहे.” अरे कसली भांडवलशाही.. कसला हल्ला ... काहीही काय... चित्रपटातील उद्योगपती -पार्क- कधीही नोकरांशी वाईट वागत नाही.. उलट कसलीही शहनिशा न करता त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो... “पॅरासाईट कधीकधी मूळ झाडंच खाऊन टाकतं. समाजात खालच्या वर्गाविषयीची किळस, तुच्छता कधीकधी तुमच्या जीवावरतीही बेतू शकते.” हे वाक्य तर मूर्खपणाची हद्द आहे.. मालकाला फसवून नोकरी मिळवलेली.. मालक त्याला आदराने वागवतो.. तरीही त्याचा कारण नसताना मालकाचा खून करणे हा निव्वळ कृतघ्नपणा आहे.. त्याला असला काही रंग देणे म्हणजे.. काय बोलावं... “बाँग जून हो या दिग्दर्शकाचा हा सिनेमा जगभर कौतुकानं पाहिला जातो आहे. कारण हा सिनेमा म्हणजे खरंतर एक हलवून टाकणारी, अस्वस्थ करणारी थप्पड आहे. समाजपुरुषाच्या तोंडात अशी थप्पड मारायची हिंमत क्वचित कोणतातरी सिनेमा करतो.” असं मुळीच वाटत नाही.. एक बरा सिनेमा इतकच.. त्यात काही flaws देखील आहेतच... मुळातच ते गरीब कुटुंब महाबिलंदर आहे.. मालकाकडे चौघेही काम करतात. पण हे एकच कुटुंब आहे हे त्याला कळणार नाही याची काळजी घेतात... मालक काही दिवसांसाठी बाहेरगावी जातो तेव्हा हे चौघेही त्याच्याच घरी दारूची यथेच्छ पार्टी करतात.. इतके निगरगट्ट आणि बेशरम कुटुंब आहे.. यातील मुलगा मालकाच्याच अल्पवयीन मुलीला फूस लावण्याचा प्रयत्न करतो... त्यांच्या मालकाच्या घरात एक तळघर असते.. आणि ते मालकाला माहित नसते.. घरातील जुनी मेड बाई असते तिला टी.बी. झाल्याचे खोटे भासवून तो गरीब बाप, मेडच्या जागी बायकोला नोकरी लावून देतो... त्या मेड चा नवरा तळघरात लपून राहात असतो... एक दिवस ती मेड नवऱ्याला भेटायला येते आणि हे रहस्य ह्या बदमाश कुटुंबाला कळते.. मेड चा नवरा आणि ह्या कुटुंबात बाचाबाची होते. मालक सुट्टीवरून परत आल्यावर घराच्या lawn मध्ये पार्टीचे आयोजन करतात.. त्यावेळी तळघरात हाथापाई होते... आणि त्यातच गरीब मुलाच्या डोक्यात त्या मेडचा नवरा दगड घालतो... बाहेर येऊन मुलीचा खून करतो.. मुलीची आई त्याचा खून करते.. आणि बाप विनाकारण मालकाचा खून करतो.. आणि निर्लज्जपणे त्याच तळघरात लपून बसतो.. मालकाची पत्नी घर सोडून जाते... आणि मुलगा बरा झाल्यावर बापाचा शोध घेतो. तेव्हा त्याला कळते की बाप त्याच तळघरात आहे. मुलगा ते अवाढव्य घर विकत घेण्याचे स्वप्न पाहतो... आणि सिनेमा संपतो.. गरिबी विरुद्ध भांडवलदार.. शोषक विरुद्ध शोषित.. गरीबीचे विदारक वास्तव .. असली लेबले या चित्रपटाला लावणे म्हणजे शुद्ध भंपकपणा आहे.. एकंदरीत माझ्या मते हा सिनेमा hyped आहे.. ऑस्करच्या लायकीचा मुळीच नाही..वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.