चित्रस्मृती


चित्रस्मृती

  गाण्याच्या रेकाॅर्डिंगला स्टार हजर राहत......
         काही काही कलाकार आपली भूमिका अधिकाधिक चांगली व्हावी म्हणून अनेक स्तरांवर मेहनत घेत असे जुन्या काळातील अनेक किस्से, गोष्टी, कथा ( अगदी दंतकथाही) प्रसिद्ध आहेत....
      त्यातीलच एक गोष्ट म्हणजे, गाण्याच्या रेकाॅर्डिंगच्या वेळी हजर राहून "आपल्यावर चित्रीत होणारे गाणे " समजून घेणे. म्हणजे कुठे कसे एक्प्रेशन द्यायचे,  हातवारे करायचे याचा अभ्यास झालाच. ( दिलीप कुमार एका वेळी एकाच चित्रपटातून भूमिका साकारण्याचा हा फायदाच)  ही सगळी  सकारात्मक पूर्वतयारी झाली ( म्हणूनच तर जुन्या चित्रपटातील गाण्याचा मुखडा आठवला तरी त्याचे पडद्यावरचे रुपडेही डोळ्यासमोर येतेच.)
      दिलीपकुमारची तर ही खासियत इतकी आणि अशी होती की, आपण एखाद्या गाण्यात कोणते वाद्य वापरणार आहोत याचेही ते आवश्यक इतपत शिक्षण घेत. या फोटोत ते आपल्या पत्नी अर्थातच सायरा बानूसोबत संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्यासोबत छान थट्टा मस्करीत रमलेत. ही संगीतकार जोडी रेकाॅर्डिंगच्या वेळी हलकेफुलके विनोद करत वातावरण रिलॅक्स ठेवत.
       दिग्दर्शक ए. भीम सिंग यांच्या 'गोपी ' ( १९७०) च्या वेळची ही भेट आहे. विशेष म्हणजे दिलीप कुमार आणि सायरा बानू यांनी एकत्र भूमिका साकारण्याचा योग चक्क त्यांच्या लग्नानंतर आला.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. [email protected]

      10 महिन्यांपूर्वी

    छान .आनंदाने केलेले काम बघणाऱ्यांनाही तेवढाच आनंद देते . वर्तनात निखळपणा खूप आवश्यक आहे .वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen