जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.सत्यजित राय एक अनुभव
सुधीर नाडकर्णीसत्यजित राय हा अस्सल बंगाली मातीतला दिग्दर्शक. त्यांनी निर्माण केलेले सर्व चित्रपट बंगाली पार्श्वभूमीवर बंगाली भाषेत आणि बहुतांशी रवीन्द्रनाथ टागोरांच्या किंवा अन्य वंग कादंबरीकारांच्या कथाकारांच्या साहित्यावर बेतलेले होते. अपवाद फक्त दोन हिंदी चित्रपटांचा. पूर्ण लांबीचा शतरंज के खिलाडी ( १९७७) आणि दूरदर्शनसाठी बनवलेला ४५ मिनिटांचा लघुपट सद्गती (१९८१). दोन्ही मुन्शी प्रेमचंद यांच्या कथानकावरून बेतलेले होते. सत्यजित राय ह्या नावाशी मी परिचित होतो. तरीही मी शतरंज पहिला तो अमजद खान, संजीव कुमार, शबाना आझमी वगैरे कलाकारांसाठीच. चित्रपट पाहून मी भारावून गेलो. राय ही काय चीज आहे ह्याची थोडीफार कल्पना मला आली. चित्रपटाचे वातावरण १८५६ सालचे आहे. लखनौचा विलासी नवाब वाजिद अली शाह आणि त्याच्या राज्यातील बुद्धिबळ खेळणारी जोडी हांच्या माध्यमातून राय ह्यांनी त्याकाळच्या राज्यकर्ता आणि प्रजा ह्यांच्या केवळ विलासीपणामुळे आलेल्या नाकर्तेपणावर, निष्क्रियतेवर अचूक बोट ठेवलेले आहेआणि त्यामुळे आपला देश ब्रिटिशांना आंदण कसा दिला गेला ह्यावर सूचक भाष्य मोजक्या दृश् ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
सत्यजित राय एक अनुभव
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-08-16 23:49:43
[email protected]
5 वर्षांपूर्वीअतिशय छान . वास्तवाचे भान करुन देणारे ,संवेदनशील चित्रपट सत्यजीत राय यांनी बनविले .
Anita
5 वर्षांपूर्वीछान लेख!