A Journey to Cinema of Satyajit Ray


जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.
 A Journey to Cinema of Satyajit Ray
 – युवराज माने
भारतात चित्रपटरसिक असणं ही फारशी नावीन्याची बाब नाही. बहुतांश जनता चित्रपटविषयक चर्चेत आपलं मत हिरिरीने मांडतच असते. परंतु कोणत्याही चित्रपटासंदर्भात अभ्यासपूर्ण निरीक्षणं मांडणं यासाठी मात्र काही अंशी चित्रपटनिर्मितीचंही तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्यांना चित्रपट अधिक खोलवर समजून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी काही विशेष उपक्रम उपलब्ध आहेत. अशाच एका उपक्रमाने मला चित्रपटातील लहानमोठे बारकावे समजून घेण्याचा संयत दृष्टिकोण दिला.
साधारण 4 ते 5 वर्षांपूर्वी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (NFAI) चित्रपट रसास्वाद शिबिरासंदर्भात मला माहिती मिळाली. अनेक दिग्गज चित्रपटसमीक्षक, तज्ज्ञ, अभ्यासक अशी मंडळी या शिबिरात त्यांचे विचार मांडणार होती. या सर्वांनी चित्रपट अधिक समरसून समजून घेण्याच्या तंत्राची उत्तम माहिती तर दिलीच पण याशिवाय काही महत्त्वाचे जागतिक चित्रपट आणि दिग्दर्शक यांचीही ओळख करून दिली. यातीलच एक नाव होतं सत्यजित रे यांचं.
एक दिग्दर्शक म्हणून रे यांच्याबद्दल मला फारशी कल्पना नव्हती. त्यांचं नाव कुठेतरी ऐकल्याचं अंधुकसं स्मरत होतं ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.