चित्रस्मृती


चित्रस्मृती
'सिलसिला 'च्या पब्लिसिटीची फसलेली गोष्ट....
        सिनेमाच्या जगात 'पब्लिसिटीची गोष्ट ' हा खूपच मोठा आणि महत्त्वाचा फंडा आहे, त्या बळावर चित्रपट खरंच यशस्वी ठरतो अथवा नाही, हा विषय वेगळा!
    एका बहुचर्चित चित्रपटाच्या पब्लिसिटीबाबत काय घडलं हे मात्र रोमांचित करणारे आहे.
     यश चोप्रा दिग्दर्शित 'सिलसिला ' ( १९८१) ची घोषणा झाली आणि मिडियातून सूर/धूर/नूर  उमटला की, या चित्रपटात रेखा अमिताभ बच्चनला लाडाने  'लंबू ' का म्हणते? या दोघांच्या अफेअरची 'इनसाईट स्टोरी ' काय आहे? या दोघांच्या अनोख्या नातेसंबंधात जया बच्चनचा रुसवा फुगवा आणि एकूणच हा प्रेम त्रिकोण, त्यात 'पती पत्नी और वो 'चा जबरदस्त रंजक फाॅर्मुल्या आहे अशी गाॅसिप्स मॅगझिनमधून उलटसुलट चर्चा सुरु झाली. रेखा म्हटलं की गाॅसिप्स हे त्या काळातील मोठे वैशिष्ट्य.  अगोदरच काही बहुचर्चित आणि उत्तम विक्री असलेल्या काही गाॅसिप्स मॅगझिनमधून अमिताभ आणि रेखा यांच्या संबंधात आणि संदर्भात काय वाट्टेल ते रंगवण्याचा सपाटा लावला होता, म्हणून अमिताभमध ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.