इरफान खान  - कॉमनमॅन


इरफान नावाचा कलाकार त्याच सर्वसामान्य पात्रांमध्ये विखुरला गेलाय. इरफान खरंच 'रुह' झालाय. हैदरमधला इरफानचा डायलॉग आठवतोय? इरफानने सांगितलं होतं, "मैं था, मैं हुं, मैं ही रहुंगा"! इरफान अजूनही त्याच्या चित्रपटांत आहे, आणि तो तिथेच असेल. हो, फक्त आता त्याला अजून संधी मिळणार नाही स्वतःला अजमावून पहायची इतकंच! आपण त्याला नवनव्या भूमिकांमध्ये पाहू शकणार नाही इतकंच! पण तो मकबूल असेल, तो लंचबॉक्स मधला फर्नांडिस असेल, तो पानसिंग तोमर असेल, तो रुहदार असेल. कधी पाय पटेल होऊन, कधी डॉ राठा होऊन, कधी योगी होऊन, कधी शौकत होऊन इरफान आपल्याला भेटत राहील....

          इरफान खान  - कॉमनमॅन

  इरफान गेला… खरंतर गेल्या दोन वर्षांत बऱ्याचदा मनाला समजावलं होतं की इरफानने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात स्वतःला सिद्ध करण्यासाठी केलेल्या आयुष्याच्या स्ट्रगलमधून तो जसा बहरत गेला तसाच तो या आजाराच्या स्ट्रगलमधूनही बाहेर पडेल आणि त्यानंतर अधिकाधिक बहरत जाईल. पण नाही… कित्येकदा मनाला चाटून गेलेली भीतीच खरी ठरली शेवटी… इरफान गेला! हे मी परतपरत यासाठी लिहितोय कारण इरफान गेला यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. इरफान जाण्याने नेमकं काय झालंय? "आम्हांला वगळा गतप्रभ झणीं होतील तारांगणे" म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय येतोय. तो गेला त्या दिवशी सतत फिल्म्स बघणाऱ्या, त्यावर लिहिणाऱ्या, फिल्म हा म्युच्युअल टॉपिक असणाऱ्या कित्येक मंडळींचा त्याच्या जाण्याने  "पर्सनल लॉस" झाला होता तर क्वचितच चित्रपट या माध्यमाकडे वळणारी मंडळीही त्यांच्या चित्रपट हा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या मित्रांना फोन करून "अरे काय acting करायचा रे तो" म्हणत हळ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. [email protected]

      12 महिन्यांपूर्वी

    🙏

  2. bookworm

      2 वर्षांपूर्वी

    मिस् यु इरफान! अप्रतिम लेख!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen