वटवृक्षाच्या छायेखाली इतर झाडंझुडपं वाढत नाहीत,असा निसर्गनियम आहे. इथं तर खुद्द कपूर कुटुंबातच राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर असे तीन वटवृक्ष होते. सहकलावंतांपैकी म्हणाल तर अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र हे आणखी काही वटवृक्ष. परंतु, ऋषी कपूर नावाचं रोपटं या सर्व वटवृक्षांच्या सावलीत राहून नुसतंच रुजलं, वाढलं नाही तर ते सर्वदूर पसरलं. त्याला कालांतरानं फळं, फुलं लागली नि त्यानं आपल्या छायेत आलेल्या प्रत्येकाचं मन सुगंधी केलं.सप्तरंगी
वटवृक्षाच्या छायेखाली इतर झाडंझुडपं वाढत नाहीत,असा निसर्गनियम आहे. इथं तर खुद्द कपूर कुटुंबातच राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर असे तीन वटवृक्ष होते. सहकलावंतांपैकी म्हणाल तर अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र हे आणखी काही वटवृक्ष. परंतु, ऋषी कपूर नावाचं रोपटं या सर्व वटवृक्षांच्या सावलीत राहून नुसतंच रुजलं, वाढलं नाही तर ते सर्वदूर पसरलं. त्याला कालांतरानं फळं, फुलं लागली नि त्यानं आपल्या छायेत आलेल्या प्रत्येकाचं मन सुगंधी केलं. काल इरफान खान गेला आणि आज ऋषी कपूर. लागोपाठ दोन दिवस अत्यंत चटका लावणारी दोन दिग्गजांची एक्झिट, हिंदी चित्रपटसृष्टीनं तसेच रसिकांनीही यापूर्वी बहुधा अनुभवली नसावी. तो आला, त्यानं पाहिलं नि जिंकलं या नोटवर ऋषी कपूरची कारकिर्द सुरू झाली नि उत्तरोत्तर ती बहरतच गेली. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी कॅमेऱ्याला सामोरा जाणारा ऋषी अगदी शेवटच्या क्षणीही कॅमेऱ्यासमोरच होता. मृत्यूच्या आदल्या रात्री त्यानं आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचंही मनोरंजन केलं म्हणे. एका डॉक्टरला गाणं म्हणायला लावलं नि जाता जाता त्याच्या कलेचं कौतुक करीत ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
asmitaphadke
5 वर्षांपूर्वीछान लेख
shriwa
5 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख !
Mannishalohokare
5 वर्षांपूर्वीअप्रतिम👍👌🙏