झेक दिग्दर्शक यिरी मेंझील


झेक दिग्दर्शक यिरी मेंझील  

झेक दिग्दर्शक यिरी मेंझील

  झेक दिग्दर्शक यिरी मेंझील यिरी मेंझिल हा झेक चित्रपट दिग्दर्शक भारतातील फिल्म सोसायटी सर्कीटवर अत्यंत लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आहे. विशेषतः त्याचा क्लोजली गार्डेट ट्रेन्स हा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना जिरी मेंझिल कसा जागतिक दिग्दर्शक आहे याची पूर्ण खात्री पटेल. मेंझिलचे इंग्रजी स्पेलिंग Jiri Menzel असे असले तरी झेक भाषेत त्याचा उच्चार यिरी मेंझिल असाच करतात. १९९८ साली मी कार्लोव्ही वेरी आंतरराष्ट्रीय महोत्सवाला गेलो होतो. त्यावेळी पर्यंत मेंझीलचे मी अनेक चित्रपट प्रभात चित्र मंडळ या आमच्या फिल्म सोसायटीत पाहिले होते.  १९९८  साली मी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आर्टिस्टिक डारेक्टर होतो. तेव्हा कार्लोव्ही वेरी महोत्सवात जर शक्य झाले तर यिरी मेंझीलला भेटून त्याचे चित्रपट महोत्सवात रिट्रॉस्पेक्टीव्ह विभागात दाखवावेत असा छुपा अजेंडा माझ्या मनांत होता. योगायोगाची घटना म्हणजे त्यावर्षी यिरी मेंझील महोत्सवात ग्रॅण्डज्युरीचा चेअरमन होता. तेव्हा त्याला भेटायला मिळेल अशी मला आशा उत्पन्न झाली. मी पत्रकार म्हणून महोत्सवाला गेलेला असल्याने प्रेस डेकवर मी मेंझीलना भेटायचे आहे अशी चिठ्ठी दिली. मला फारशी आशा वाटत नव्हती कारण कोणत्याही आंतरराप्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरी सदस्य अन्य प्रतिनिधीमधे फारसे मिसळत नाहीत. परंतु आश्चर्य म्हणजे तिस-या दिवशी प्रेस डेस्कवरच्या माणसाने मला सांगितले यिरी मेंझील तुम्हाला अमक्या हॉटेलमध्ये ७ वा. भेटणार आहेत. त्यावेळी डिनरसाठीच त्यांनी तुम्हाला निमंत्रण दिले आहे. (या युर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

 1.   2 आठवड्या पूर्वी

  मस्त लेख

 2. rmjadhav

    7 महिन्यांपूर्वी

  अतीशय सुंदर

 3. ajitpatankar

    8 महिन्यांपूर्वी

  👍👍

 4. vineshsalvi21

    8 महिन्यांपूर्वी

  Closely watched trains...

 5. shripad

    9 महिन्यांपूर्वी

  लेख छान आहे आणि समयोचित आहे.

 6. jrpatankar

    9 महिन्यांपूर्वी

  लेख. आवडला. नवीन काहीमिळाले. रसिकांची दृष्टी अधिक रूंद करता आली तर हवे आहे.वाचण्यासारखे अजून काही ...