सत्यजित राय यांचा चित्रपट- एक अनुभव


'चारुलता' या  सत्यजित राय यांच्ग्या अभिजात चित्रपटाचा प्रशांत साजणीकर यांनी लिहिलेला रसास्वाद...

सत्यजित राय यांचा चित्रपट- एक अनुभव

एखादा नितांत सुंदर चित्रपट पाहतो आणि त्यात आपण इतकं गुंतून जातो की नंतर बराच वेळ पडद्यावर काहीच पाहु नये असं वाटत राहतं. त्या चित्रपटातल्या अनेक प्रतिमा मनात रेंगाळत राहतात. चित्रपटातली पात्रं मनात घर करतात. देवपूजा करताना तळहातावर घेतलेल्या चंदनाचा सुवास जसा बराच काळ तुमच्या सोबत राहतो तसा तो चित्रपट प्रदिर्घ काळ तुमच्यासोबत राहतो. सत्यजीत राय दिग्दर्शित  " चारुलता" पाहिल्यानंतर असंच काहीसं झालं. १९६४ साली प्रदर्शित झालेला हा इतका सुंदर चित्रपट पहायला आपल्याला २०२० उजाडावं लागलं याची शरममिश्रीत खंतही मनात बोचत राहिली. सत्यजीत रे यांचं नाव केवळ " पाथेर पांचाली" पुरतंच माहित होतं. त्यातही देशाची गरिबी आणि दु:ख  विकून नाव कमावणारा दिग्दर्शक असले  खुळचट प्रवादही वाचलेले होते.  मागच्या वर्षी पुण्यात प्रभात चित्र मंडळाने आयोजित केलेल्या चित्रपट रसास्वाद कार्यशाळेत जेव्हा पहिल्यांदा " पाथेर पांचाली " मोठ्या पडद्यावर पाहिला तेव्हा हे काहीतरी वेगळं आहे याची जाणीव झाली. दुसर्‍या दिवशी डॉ. श्यामला वनारसे यांनी जेव्हा त्यांच्या सुंदर शैलीत  या चित्रपटाची सौंदर्यस्थळे उलगडून दाखवली तेव्हा हा चित्रपट जगाच्या पातळीवर का नावाजला गेला आहे ते कळाले आणि एक कलाकृती म्हणुनही त्याचे थोरपण अधोरेखित झाले.  त्यानंतर सत्यजित रे यांचे चित्रपट पाहण्याचा सपाटाच लावला आणि त्यातच एक दिवस " चारुलता" पाहिला. चारुलता या चित्रपटाची कथा रविंद्रनाथ टागोर यांच्या " नष्टनीड" ( broken nest ) या मूळ बंगाल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    Lovely

  2. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    या अत्युत्कॄष्ठ कलाकृतीची ओळख करून दिल्याबद्दल प्रशांतरावांचे आभार आणि हा योग बहुविध परीवाराने मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार . धन्यवाद.....

  3. shripad

      5 वर्षांपूर्वी

    Youtube

  4. bookworm

      5 वर्षांपूर्वी

    हा चित्रपट कुठे बघायला मिळेल?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen