चित्रस्मृती


चित्रस्मृती

होर्डींग्स नाका.....

       सिनेमाचे जग म्हणजे केवढ्या तरी छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यात असलेले/नसलेले/दडलेले अर्थ....
    गुलशन राॅय निर्मित आणि विजय आनंद दिग्दर्शित 'जाॅनी मेरा नाम ' ( १९७०) च्या पूर्वप्रसिध्दीचा भाग म्हणून केलेली एक खेळी,  गिरगावातील प्रार्थना समाज येथे या चित्रपटाच्या लागलेल्या होर्डींग्सवर पिस्तूलधारी देव आनंदला हेमा मालिनी बिलगून उभी होती. चित्रपटात अॅक्शन आणि रोमान्स यांची 'स्टोरी ' असावी असे सूचित होत होते आणि गोल्डीचा  'तिसरी मंझिल 'नंतरचा हा चित्रपट असल्याने तर त्याला पुष्टीच होती. पंधरा दिवसांनी तेथे 'जाॅनी... 'चे दुसरेच होर्डींग्स दिसले, आता देव आनंद, हेमा मालिनी, प्रेमनाथ, पद्मा खन्ना आणि प्राण यांचे फक्त चेहरे त्यावर होते....
           त्या काळात मुंबईत कुठेही गेल्यावर अशी महत्वाच्या काॅनर्सना हमखास होर्डींग्स दिसत. दादरच्या टिळक ब्रीजवरुन बेस्ट बसमधून जाताना दुतर्फा अशी भव्य होर्डींग्स दिसत. म्हणूनच तर त्या वयात 'खिडकीची जागा ' पटकावीशी वाटे. सात रस्त्याला बस आली रे आली की, न्यू शिरीन थिएटरला कोणता पिक्चर लागलाय यासह सभोवारची 'होर्डींग्सची जत्रा ' कधी बरे पाहतोय असं होई.
     आगामी चित्रपटाची प्रसिध्दी करण्याच्या अनेक माध्यमातील एक म्हणजे होर्डींग्स हे हळूहळू समजत गेले. आमच्या भवन्स काॅलेजला जाण्याच्या मार्गावर ऑपेरा हाऊस थिएटरचा भला मोठा काॅर्नर त्यासाठी खूप महत्वाचा. काॅलेजला येता जाता दोन गोष्टी क ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen