साहित्यकार रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'इन्व्हेस्टमेंट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.या चित्रपटात त्यांना दिग्दर्शनात सहाय्य करणारे त्यांचे सहकारी अरविंद औंधे यांनी वाहिलेली आदरांजली !असिस्टंटच्या नजरेतून...चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी .....तारीख,वार आठवत नाही...साधारणपणे साताठ वर्षं झाली असतील.एक दिवस अचानक मतकरींचा फोन-त्यांचा फोन नेहमी अचानकच असायचा.'उद्या संध्याकाळी काय करतोयस?''खास काही नाही .का?'-मी'मं संध्याकाळची सहा वाजता घरी ये.''बरं येतो.''नक्की वेळेत ये. नेहमीप्रमाणे रिहर्सलला करतोस तसा उशीर करू नकोस.''नाही. वेळेत येतो.'दुसऱ्या दिवशी बरोब्बर वेळेत पोहोचावं ह्या दृष्टीने अगदी अर्ध्या तासाचं मार्जीन ठेवून निघालो.वाटेत असतानाच बरोब्बर सहा वाजता पुन्हा फोन,'कुठे आहेस? सहा वाजले.''मी एका मिनिटावर आहे.पोहचतोच..'त्यांच्या घरी पोचलो. लगेचच चहा पाणी वगैरे आटोपलं. म्हणाले,' बस.हे ऐक.'अपेक्षा होती, उत्सुकता होती-एक नवीन ,ताजं, कोरं नाटक ऐकायला मिळणार.मतकरींकडून नव्या नाटकाचं वाचन ऐकणं हा आगळा आनंद ज्यांनी अनुभावलाय त्यांना माझ्या प्रसन्न झालेल्या चित्तवृत्तीची कल्पना लगेच येईल. वाचन सुरू झालं.पहिल्या ओळीपासूनच लक्षात आलं, हे काहीतरी वेगळंच आहे. त्यांच्या खास ओघवत्या शैलीत त्यांनी नॉनस्टॉप स ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
असिस्टंटच्या नजरेतून... चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-10-19 15:12:54
Shrikant Pawar
4 वर्षांपूर्वीखूप छान लेख
खूप छान लेख. नुकतेच त्यांचे आत्मनेपदी वाचले होते. इतरांनी पाहिजे तेवढी नोंद न घेतल्याची खंत त्याही पुस्तकात आहे..
asiatic
5 वर्षांपूर्वीअतिशय हृद्य लेख. मतकरींचं वेगळं रूप दाखवलंय. अभिनंदन. लेख अपलोड करताना अधिक काळजी घ्यायला हवी असं वाटतंय. शुद्धलेखनाच्या चुका बघायला हव्यात. दुर्लक्ष करता येत नाही. आपुलकी वाटते, म्हणून लिहिले आहे.
shripad
5 वर्षांपूर्वीखूप छान लेख.