fbpx

पुण्यनगरीतील पुनश्च मित्रमेळावा सुफळ संपन्न !

पुनश्चचा पुण्यातला दुसरा मित्रमेळावा गेल्या शनिवारी पार पडला. पुण्यातले आपले सभासद श्री. राजीव कुलकर्णी यांनी त्यांच्या निवासस्थानी मेळाव्याची तयारी दर्शवल्याने, कोथरूड या मध्यवर्ती ठिकाणी कार्यक्रम घेता आला.

मेसेजिंगच्या प्रॉब्लेममुळे अनेक सभासदांना ठिकाण समजले नाही, त्यामुळे अपेक्षेपेक्षा संख्या बरीच कमी होती. तरीही ११ जण उपस्थित राहिलेच. मेळाव्यात नेहमीप्रमाणे ओळख करून घेणे, सभासदांच्या सूचना, तांत्रिक अडचणी, भावी योजना याबद्दल अनौपचारिक गप्पा रंगल्या. सोबतीला गरम सामोसे आणि चहा असल्याने कार्यक्रम लज्जतदारही झाला.

सुभाष नाईक , यशोधन जोशी , अनिल कुलकर्णी, आराधना कुलकर्णी, अजय गोडबोले, विजय दामले, श्री पिंपळे, विनोदिनी पिंपळे, नेहा लिमये, जगदीश पळनीटकर, स्वप्नील कुलकर्णी या सर्वांशी गप्पा मारणे, आणि त्यांचे इनपुट्स जाणून घेणे हा चांगला अनुभव होता. बहुविधचे प्रवर्तक किरण भिडे, अतुल भिडे  तसेच आमचे सक्रीय मार्गदर्शक श्रीकांत बोजेवार, हे अर्थातच उपस्थित होते.

आपल्या पोर्टलवर, ‘मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र’ हे अतिशय उपयुक्त सदर चालवणारी लेखिका नेहा लिमयेशी या निमित्ताने आमचा प्रत्यक्ष परिचय झाला. यशोधन, जगदीश आणि स्वप्नील या टेक्नोलॉजीशी संबंधित तरुण मुलांकडून पुनश्चची तांत्रिक बाजू अधिक भक्कम कशी करता येईल यावर महत्वाची चर्चा झाली. हे परवाच्या मेळाव्याचं मोठं फलित होतं असं म्हणता येईल.

एकंदर पुढील कामासाठी पुरेशी उर्जा देऊन या कार्यक्रमाचा समारोप झाला. पुढचा मेळावा मार्च महिन्यात नासिकला घ्यावा असा विचार आहे. त्या अनुषंगाने नासिकच्या वाचकांशी आम्ही लवकरच संपर्क करू.

**********

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'संपादकीय' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'संपादकीय' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

  1. लेख आवडला.मित्रमेळावा चांगला झालेला दिसतो.

  2. नाशिक मधील मित्र मेळाव्यासाठी खूप शुभेच्छा ! मराठी भाषा तंत्र आणि मंत्र या लेखमालेच्या लेखिकेची प्रत्यक्ष भेट झाली यावरून सुचवावेसे वाटते कि ही लेखमाला पुढे यावर्षीही चालू राहावी.प्रत्येकाला मराठी शब्दकोश जवळ बाळगणे शक्य नसते.काही वाक्प्रचार [ उदा.अनागोंदी कारभार,बादरायण संबंध ई.] व त्त्यामागची कथा हे सर्व अप्रतिम होते. यावरूनच सात आठ वर्षापूर्वी रविवारच्या लोकसत्तामध्ये इंग्रजी वाक्प्रचार .त्याला समानार्थी मराठी शब्द /म्हण व त्यामागची कथा /दंतकथा असे एक सदर अंबरनाथ येथील एक लेखक छान सदर लिहायचे .ते म.सा .प.चे सभासद होते ज्यांनी तेथील शिवमंदिरावर मोठे पुस्तक लिहिले आहे [ नाव आठवत नाही] [उदा. gordian knot -ग्यानबाची मेख , पूर्णपणे नेस्तनाबुत –dead as dodo] अतिशय रंजक व माहितीपूर्ण सदर होते ते ,याची आठवण झाली. अशा प्रकारचे वळण लिमये madam नी दिले तरी चालावे. इतर नेहमीचे लेख अप्रतिमच .

  3. मन:पूर्वक शुभेच्छा!!

  4. वाचक मित्रमेळावा छान उपक्रम, तो कोकणातही व्हावा ही विनंती

Leave a Reply

Close Menu