अंक : ललित - एप्रिल-मे-जून २०२० झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचं २६ एप्रिल, २०२०, रोजी निधन झालं. साधारण आठ-दहा वर्षांपूर्वी त्यांची काही पुस्तकं वाचून त्यांचा शोध घेतला होता. मुंबई-पुणे रस्त्यावर बाजूने वसलेल्या वस्तीत ते राहत होते. शोधत शोधत त्यांचं घर गाठलं तर ते आजूबाजूला कुठंतरी गेले होते. निरोप मिळाला तसे लगबगीनं आले. एका छोट्या बसक्या घरात मग ते स्वतःविषयी, लेखनाविषयी मोकळेपणानं बोलले. त्यात ना कसली खंत होती, ना कुठला लेखकपणाचा मुखवटा.. कुठला आवेश ना कुठला आविर्भाव.. आपल्या लिहितेपणाचं भान तर त्यांना होतं, पण त्यातून मिळत गेलेल्या नाव, पैसा, प्रसिद्धी आदी गोष्टी त्यांच्या गावीही नसाव्यात. एक साधा, सच्चा, प्रांजळ अन् धगधगते अनुभव बाळगून असणारा लेखक. फार अजब होतं हे लेखकपणाचं रसायन. पुढे साधारण ८-१० वर्षांनी लेखक गणेश मतकरी यांनी तुपे यांच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी फेसबुकवर लिहिलं, ते वाचून अस्वस्थ वाटलं. नाटककार अतुल पेठे त्यांना काही मदत करणार होते, त्यामुळे दुसर्या वेळी पेठे यांच्या बरोबर पुन्हा एकदा तुपे यांची भेट झाली. तुपे आणि तुपे यांचं घर ८-१० वर्षांत थोडं थकलं होत. दारिद्य्राच्या काजळीची रेषा गडद झाली होती. तुपे मात्र तसेच सहज होते. परिस्थिती सांगत असताना ना कुठली मागणी होती ना कुठली अपेक्षा.. सगळ्या आठवणींनिशी लख्ख असणारे तुपे फ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .