हा पुरस्कार आपल्या कामासाठीचा (सरस्वती सन्मान)


अंक - ललित : एप्रिल - मे - जून २०२०  लेखक जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उभा राहतो तेव्हा हा पुरस्कार आपल्यासाठी नसून आपल्या कामासाठी आहे याचे भान त्याने ठेवलेले बरे. हा सखोल आणि उपयुक्त असा विचार आहे. उपयुक्त यासाठी की, लेखकाची निर्मिती ही त्याच्यापेक्षा लहान असल्याने आपण याचे एकमेव निर्माणकर्ता असल्याच्या भ्रमापासून हा विचार त्याला दूर ठेवतो. असा काही भ्रम कायम राहिल्यास लेखक स्वतःमध्ये अधिक अधिक गुंतून राहील आणि आयुष्यभर अशा रखरखीत वाळवंटात भटकत राहील, ज्यामुळे मन दुबळं करणारा एक कालखंड येईल, जेव्हा सूर्याला आपण दर्शन द्यावं असं वाटणार नाही आणि चंद्राकडे उदय पावण्याची शक्ती नसेल. सत्य हेच आहे की, निर्मिती त्याच्या अंतर्मनातून झाली असली तरी, ती त्याच्या अस्तित्वाच्या सीमारेषा भेदून, त्याच्या अस्तित्वाबाहेर बहरते. आपल्या निर्मितीविषयी वृथा अहंकार बाळगण्यापेक्षा, आपल्या अशा बंदिस्त विश्वात राहून, आपलं अस्तित्व पुनःपुन्हा भेदलं जाण्याच्या अनुभवाची प्रतीक्षा करावी. लेखनकाळ संपण्याआधी, त्याच्या बाह्य अस्तित्वाला वारंवार तडे जाऊन त्याची रूपरेषा बदलली, तर ते लेखकाचं सर्वोच्च भाग्य असेल. हे भाग्य फार थोड्यांना लाभतं, आपल्यापैकी बहुसंख्यांना एखाद दुसरा तडा असलेल्या तटबंदीमध्ये राहावं लागतं. तेच आपलं भागधेय असेल, तर तसं असो. नासक्या अहंभावातून उद्भवणार्‍या अपायकारक विचारांना आपण खतपाणी घालू नये. तसं केल्यास, ज्ञानकिरणांना आत प्रवेश करता येणार नाही. दुसर्‍या शब्दात सांगायचं तर स्वयंस्फूर्तीचा दावा करण्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , ललित- एप्रिल-मे-जून २०२०

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen