लक्षवेधी पुस्तके - वसुधारा, पतंग, कवितेचा अंतःस्वर, विस्मृतीच्या उंबरठ्यावर


अंक : ललित, एप्रिल-मे-जून २०२०  *** वसुधारा : मूळ बंगाली लेखिका : तिलोत्तमा मजुमदार मराठी अनुवाद : सुमती जोशी उन्मेष प्रकाशन : चंद्रनील अपार्टमेंटस्, ‘सी’ विंग, कॉसमॉस बँकेसमोर, सिंहगड रस्ता, पुणे- ४११०३० पृष्ठे : ५१२,  मूल्य : सहाशे रुपये ही धारावाहिक स्वरूपात आकाराला आलेली महाकादंबरी. महाकादंबरी की महाकाव्य? महाकाव्यच! कारण इथे प्रत्येक व्यक्तीच्या, परिसराच्या, घटनांच्या, धर्माच्या, देशाच्या, मातीच्या, संस्कृतीच्या संदर्भात एकमेकांत गुंतलेले इतके धागे आहेत की एखादाही हाती लागलासे वाटले की त्यातून नवनवीन आकृतिबंध तयार होतात, शक्यता दिसू लागतात. माणूस-निसर्ग, माणूस-धर्म, माणूस-संस्कृती, धर्मकारण-राजकारण, माणूस-माणूस... या सर्वादींचे परस्परसंबंध, अन्वय-अर्थान्वय प्रत्यही नव्याने आकळत जातात. महाभारतासारखं महाकाव्य ज्या भूमीवर घडले त्याच्या जवळपासच कलकत्त्याच्या-वंगभूमीवर घडणारे हे महानाट्य आहे. अगदी अलीकडचे... सत्तरच्या दशकातले. त्यामुळे इथे घडणार्‍या राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक घटनांशी आपण (वाचक) परिचित असतो, साक्षी असतो. अर्थात ‘चिरकालापासून असंच घडत आलंय... या गोष्टी वर्षानुवर्षे घडत असतात, त्या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित- एप्रिल-मे-जून २०२०

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen