अंक : ललित, एप्रिल-मे-जून २०२० इस शहर मे हर शख्स परेशां सा क्यूं है? खाना नहीं चाहिये, बस हमें घर जाना है। पोटाची खळगी भरायला आलेले तरुण, वयस्क स्त्रीपुरुष अगतिक होऊन रडवेल्या चेहर्याने घरी जायचंय असं का म्हणत होते? लाखोंच्या संख्येने रोजीरोटीसाठी बंबई जवळ केलेले हे-खास करून-युपी बिहारवाले, असं काय झालं होतं की ‘हमे अपने घर जाना है, चाहे जो भी हो।’ असं काय झालं होतं की हजार, दीड हजार मैलांवरच्या घरी पायी, सायकलने, ट्रकवर बसून हे कामगार निघाले होते? घरी असं काय ठेवलं होतं वा संकट आलेलं होतं की परतायची निकड अगदी निकरावर येऊन व्यक्त होत होती. पाठीवर हॅवरसॅकमध्ये चार कपडे, पोळ्यांचं गाठोडं, पाण्याची बाटली एवढा संसार घेऊन हजारोंच्या संख्येने लोक चक्क चालत प. बंगाल, बिहार, राजस्थानकडे चालले होते. ह्याचं वर्णन करतानाही माझी लेखणी कापतेय. त्यांची अवस्था पाहवत नव्हती. तिथं तरी काय मोठं डबोलं मिळणार होतं, की ज्यासाठी हे लोक मुंबई सोडून चालले होते. वाटेवर नि तिथे त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलं होतं हे त्यांनाच काय देवालाही ठाऊक नसावं. अस्मानी, सुलतानी कुठलं संकट कोसळलं होतं, की असा अघोरी म्हणावा असा उपाय ते करू पाहत होते. त्यांचे स्थलांतर पाहताना एक तीव्र अशी कासाविशी सरकारदरबारी, उद्योजक, कंत्राटदार, प्रशासकांच्या पातळीवर देखील जाणवत होती. जगाने अनुभवलं, पाहिलं नसेल असं कोरोना नामक आजाराचं संकट अचानक उद्भवलं होतं. त्यावर ठोस उपाय गवसत नव्हता. आजाराच्या भीतीने कामं बंद झाली होती. उपासमार व्हायची वेळ आली होती. एकेका खोलीत आठआठ कामगार राहत होते. डोक्यावर छप्पर नाही, कंत्राटदार अशा संकट काळी देखील मदतीचा हात देत नव्हता ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .