आज तसाच बेचैन आहे........

ललित    विजय तेंडुलकर    2020-10-19 00:38:52   

अंक : ललित, सप्टेंबर २०२० - सदर : सरस्वती सन्मान

मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ 

(तिसर्‍या सरस्वती सन्मानाची घोषणा (१९९३) १० डिसेंबर, १९९३ला करण्यात आली. सन्मान समारंभ ३ मार्च, १९९४ ला फिक्की सभागृह, तानसेन मार्ग, नवी दिल्ली इथे संपन्न झाला.)

***

साहित्याच्या वाटेवरून चालायला सुरुवात करण्यापूर्वी, खरं म्हणजे शब्दांना काही अर्थ असतो हे लक्षात येण्याअगोदरच एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती.

जोरजोरात रडलं की, पाहिजे ते मिळतं.

फक्त आवाज मोठा हवा. खरं म्हणजे त्यात आक्रमकता हवी.

झक् मारून लोक तुमच्याकडे लक्ष देतात.

लवकरच अजून एक गोष्ट लक्षात आली.

रडणं-ओरडणं, गोंधळ घालणं इतकंच आवश्यक आहे असं नाही, तर दुसर्‍यांच्या इच्छेप्रमाणे वागलं, तर बक्षीस मिळतं.

अर्थात ते प्रत्येकवेळी मिळतंच असं नाही. पण बहुतेक वेळा मिळतं.

[caption id="attachment_22402" align="alignright" width="241"]                          विजय तेंडुलकर[/caption]

कधी कधी यातील हुशारी समजणाराही कुणी ना कुणी भेटत असे. पण तेव्हा काही फायदा झाला नाही तरी तोटाही होत नसे. ‘हुशार आहे, नाटक करतोय.’ असं सर्टिफिकेट मिळत असे.‘बघितलंत?कुणाला कसं खुश करावं हे याला आत्तापासून कळतंय.’

त्यांच्या म्हणण्याचा अर्थ कळण्याइतकं तेव्हा माझं वयही नव्हतं. शब्द शिकण्यापूर्वी माणसात हुशारी ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘ललित’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


ललित - सप्टेंबर २०२०

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.