येथे करोनावरील पुस्तके मिळतील...!

ललित    पांडुरंग आय्या    2020-10-15 14:17:14   

अंक : ललित, सप्टेंबर २०२०

सदर : झारा आणि सराटा

काही प्रकाशक फारच दक्ष असतात. त्यातही ‘राजहंस’वाले माजगावकर अधिकच दक्ष असतात. पण दक्ष दक्ष म्हणजे तरी किती दक्ष असावे माणसाने? करोना आपले हातपाय देशभरात पसरतच होता, तेवढ्यात राजहंसनं करोनावरचं पुस्तक बाजारात आणलंसुद्धा. एवढ्या तातडीनं माजगावकरांनी आपली दखल घेतली हे पाहून करोनासुद्धा बिना लशीचाच बेशुद्ध पडला असेल. बाजारात काय खपतं याचा अंदाज येणं आणि इतरांना तो अंदाज येण्याआधीच आपली चीजवस्तू विक्रीसाठी बाजारात आणणं यातला फरक माजगावकर नेहमीच कृतीमधून दाखवत असतात. माजगावकरांचे वूहानपर्यंत नेटवर्क आहे की काय असा संभ्रम त्यामुळे अनेकांना पडला.चीनमधील वूहान नामक शहरात करोनाचं पहिलं अस्तित्व दिसल्याच्या सिंगल कॉलम बातम्या वृत्तपत्रांच्या कोपर्‍यात प्रसिद्ध होत होत्या, तेव्हाच माजगावकरांनी डॉ. बोरसे यांना बोलावून घेतलं असणार (साहित्यक्षेत्रातील लोक बोरसेंना वैद्यकीय डॉक्टर समजतात आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना वाटतं की ते साहित्यातले डॉक्टर आहेत.) आणि करोनाच्या... सॉरी... ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ जन्माला घालण्याचं ठरलं असणार.

या नव्या व्हायरसमुळं जगात ट्रम्प यांच्यापासून ते मोदींपर्यंत आणि झालंच तर थेट आपल्या उद्धवराव ठाकरेंपर्यंत अनेकांना अनेक प्रश्न पडले आहेत. परंतु अवघ्या महाराष्ट्राला गेले सहा महिने या व्हायरससंबंधीच्या एका वेगळ्याच प्रश्नानं दुभंगून टाकलेलं आहे. महाराष्ट्राला पडलेला तो यक्षप्रश्न म्हणजे, ‘क?’ की ‘को?’ हा होय. हल्ली अनेक वृत्तपत्रांत कानामात्रेचाही  फरक न होता डिट्टो त्याच त्या बातम्या दिसतात. पण याबाबतीत मात्र काना-मात्रा द्यायचा की कानामात्रेला फाटा द ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘ललित’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


ललित - सप्टेंबर २०२०

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.