माझी शाळा, मराठी शाळा - अ.भि.गोरेगावकर इंग्लिश स्कूल


मराठी माध्यमाची शाळा असली तरीही इंग्रजी अवगत असण्याची काळाची गरज लक्षात घेऊन शाळेत त्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. सुजया फाउंडेशन या संस्थेचा मराठी शाळांमधील मुलांचे इंग्रजी चांगले होण्यासाठीचा विशेष प्रोग्राम आहे. त्याचे प्रशिक्षण शिक्षकांनी घेतले आहे. प्रत्येक मुलाला त्याच्या गतीने शिकता यावं असा त्यांचा Online Programme आहे. त्यासाठी संगणक कक्षात जाऊन मुले आपापली उसंत घेऊन ही भाषा शिकतात. तिथे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकाव्यतिरिक्त वेगळी व्यक्ती उपलब्ध असते. ही व्यक्ती वर्षभर मुलांबरोबर Spoken English वर काम करते. या व्यक्तीची English Trainer म्हणून संस्थेने नेमणूक केलेली आहे. मुलं वर्षभर जे शिकतात त्याचे पालकांसमोर वर्षाखेरीस सादरीकरण करतात. मराठी माध्यमात शिकूनही आत्मविश्वासाने, उत्तम रीतीने मुलं संपूर्ण कार्यक्रम इंग्रजीतून सादर करतात. यामुळेच दरवर्षी होणारे १५ ऑगस्टचे प्रकल्पही अलीकडे मुलं इंग्रजीतून सादर करू लागली आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रसिद्ध गायिका साधना सरगम, भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणारा कॅ. अमोल यादव, आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीची पंच असलेली आरती बारी असे माजी विद्यार्थी लाभलेली आमची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा. तसेच वैद्यकीय, पत्रकारिता, नाटक इ. क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या आमच्या माजी विद्यार्थ्यांचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. दि शिक्षण मंडळ, गोर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    चांगले उपक्रम सुरू आहेत गोरेगावकर शाळेत. मराठी माध्यमाची शाळा इतकी चांगली असू शकते हे खूप सुखावह चित्र आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen