संपादकीय – ‘लाव रे तो व्हीडिओ!’ अर्थात, राजकारणाची बदलती भाषा

राजकारणाच्या भाषेचा अभ्यास करताना राजकीय नेत्यांची बदललेली भाषा व भाषाशैलीही विचारात घ्यावी लागेल. राजकारणात कोण, कुठे, काय, कोणाशी, कसा बोलतो याचाही अभ्यास झाला पाहिजे. यूट्यूबवर राजकीय नेत्यांच्या भाषणाचे नमुने उपलब्ध आहेत. त्यांचा शैलीनिष्ठ अभ्यास होऊ शकतो. एका वृत्तवाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांतील भाषणांचा अभ्यास करून ते कोणते शब्द वापरतात, त्यांची वारंवारिता किती, स्वतःविषयी किती बोलतात, कोणते मुद्दे मांडतात आदींचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यात म्हटले आहे की मोदींनी एकूण ३५ सभांमध्ये ‘मोदी’ हा शब्द १७६ वेळा, ‘गरीब’ हा शब्द १७३ वेळा तर ‘किसान’ हा शब्द १२४ वेळा उच्चारला. मात्र ‘रोजगार’ हा शब्द त्यांच्या भाषणात फक्त ७ वेळा आला. अशा प्रकारे इतरही नेत्यांच्या भाषणांचा अभ्यास होऊ शकतो. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या भाषणातही काही शब्द वारंवार आढळतात. उदा. हिंदू, मर्द, मावळे, वाघ, हिंमत, औलाद, पाकडे इ. शहरी नेत्यांप्रमाणे ग्रामीण भागातून उदयास येणाऱ्या नेत्यांच्या तोंडीही नव्या वळणाची आणि नव्या शब्दप्रयोगांची भाषा आढळते. प्रादेशिक बोलींच्या प्रभावातून बोलली जाणारी ही भाषा प्रमाण मराठीला निश्चितच समृद्ध करणार आहे…

—————————————————————————————————————————————————–

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. arvindjadhav

    अप्रतिम

Leave a Reply