संपादकीय – भाषानियोजनातून मराठीचा विकास

मराठीच्या आजच्या दुरवस्थेला मराठी भाषक म्हणून आपली अनास्था , सामूदायिक आळस, नाकर्तेपणा, भावनिक व भाबडेपणातून आलेली अवैज्ञानिक भाषादृष्टी, शासनकर्त्यांची उदासीनता एवढ्याच गोष्टी कारणीभूत नसून जागतिकीकरणानंतर निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीही कारणीभूत आहे. बहुभाषकच नव्हे तर तुलनेने एकभाषक असलेल्या देशांनाही आपापल्या भाषांच्या सुरक्षिततेविषयी चिंता वाटते आहे. जगाचे बदललेले अर्थकारण, दळणवळणाची अत्याधुनिक साधने, माहिती-तंत्रज्ञानामुळे झालेली संपर्कक्रांती व स्थलांतर यांमुळे जगाची वाटचाल बहुभाषिकतेकडून एकभाषिकतेच्या दिशेने चालली आहे की काय असे वाटावे इतक्या मोठ्या प्रमाणात भाषा बदल (Language Shift ) घडून येत आहे. लोक खेड्यांकडून शहरांकडे, शहरांकडून महानगरांकडे आणि महानगरांकडून प्रगत देशांकडे ज्या कारणांसाठी वळतात, जवळपास त्याच कारणांसाठी लोक बोली भाषांकडून प्रमाण भाषांकडे आणि मग प्रबळ भाषेकडे वळताना दिसतात. इंग्रजी ही ह्या बदललेल्या परिस्थितीची सर्वाधिक लाभार्थी आणि वैश्विक भाषेची प्रबळ दावेदार मानली जाते…

——————————————————————————————————————————————————–

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

 1. Rdesai

  येणाऱ्या पिढीत मातृभाषेविषयी प्रेम वाढविणे आपल्या हातात आहे.त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .

 2. pranavs

  अत्यंत मार्मिक लेख

 3. नमस्कार सर,
  लेख सुंदर आहे. जवळपास एकभाषी होऊनच गेलेल्या व्यक्तींसाठी डोळ्यांत अंजन घालणारा लेख आहे.
  इंग्रजी भाषेचं साम्राज्य आणि वर्चस्व दिवसागणिक वाढत आहे. माझा कोणत्याही परकीय भाषेवर राग नाही पण प्रगतीच्या वाटा या परकीय भाषांच्या किंवा जागतिक भाषेच्या सहाय्यानेच धुंडाळता येतात आणि मातृभाषेच्या सहाय्याने नाही, हे मला कधीही पटणार नाही.

Leave a Reply