fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

संपादकीय – अपशब्द, निषिद्ध शब्द आणि समाज

‘अलिबागहून आलास काय?’ (अलिबाग से आया है क्या?) ह्या वाक्यावर म्हणजेच त्यातील ‘तू मूर्ख आहेस काय?’ ह्या अर्थाच्या वाक्प्रचारावर बंदी आणण्यासाठी एक याचिका अलिबागच्या एका रहिवाशाने न्यायालयात दाखल केली होती. वैभवशाली परंपरा असलेल्या अलिबाग शहराचा म्हणजेच तेथील लोकांचा अवमान करणारा हा वाक्प्रचार असल्याचा त्याचा दावा होता. न्यायालायाने ही याचिका फोटाळून लावताना असे विनोद सर्व समुदायांवर होतच असतात, ते फारसे मनाला लावून घ्यायचे नसतात असे संगितले. समाजाच्या भाषिक वर्तनाबाबतच्या अशा याचिकेवर कोणतेही न्यायालय ह्यापेक्षा वेगळे काय सांगणार? समाजाचे तोंड कोण बंद करणार? असे दावे न्यायालयांना नवीन नाहीत. संता आणि बंता ही सरदारजींची काल्पनिक पात्रे घेऊन केल्या जाणाऱ्या विनोदांवर बंदी आणावी म्हणून शीख समाजातील एका समूहाने न्यायालयात धाव घेतली असताना न्यायालयाने अशीच भूमिका घेतली होती. पुणेकरांच्या नावाने काय आपण थोडे विनोद खपवतो? हा मनुष्यस्वभाव आहे आणि भाषा त्याला अवकाश पुरवते. दोष असलाच तर तो भाषेचा नसून समाजाच्या मानसिकतेचा आहे… (पुढे वाचा)


हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

  1. नित्याचे भाषाध्ययनास उपयुक्त ठरावे असे सरांचे लेखन …उत्तमच!

  2. भाषा अभिव्यक्तीचे साधन आहे.शब्द चांगले किंवा वाईट नसून ते व्यक्ती किंवा समाज्याच्या मानसिकतेवर अवलंबून असते.हे खूप छान प्रकारे परब सरांंनी पटवून दिले.
    धन्यवाद!वाचनीय लेख!
    छान !

  3. छान !

Leave a Reply

Close Menu