माहितीच्या अधिकाराचा समाजोपयोगी कामांसाठी वापर नवीन राहिलेला नाही. विविध प्रकारच्या समाजकार्यासाठी, अन्यायनिर्मूलनासाठी व सत्य जाणून घेण्यासाठी माहिती अधिकाराचा विधायक दृष्टी ठेवून प्रभावीपणे वापर करणारे कार्यकर्ते खूप आहेत. ह्या अधिकारामुळेच प्रशासनातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजवर चव्हाट्यावर आली, जी एरवी येऊ शकली नसती. ह्या अर्थाने माहिती अधिकार हे एक वरदानच ठरले आहे. कधी कधी शासकीय, प्रशासकीय कामातील अकार्यक्षमता, ढिलाई, वेळकाढूपणा यांची पोलखोल करण्यासाठीही माहितीच्या अधिकाराचा वापर केलेला दिसून येतो. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आणि माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी ह्या अधिकाराचा वापर मराठी भाषेच्या चळवळीसाठी केला. त्यांचे त्या संदर्भातील अनुभव माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आणि मराठीच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. मराठीच्या मुलखात मराठी भाषेचे प्रत्यक्षात काय चालले आहे, शासन मराठीसाठी काय केल्याचे भासवते आहे आणि शासनाच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी प्रशासन माहितीशी कसे खेळते आहे हे पाहाणे जितके उद्वेगजनक तितकेच मनोरंजकही आहे. आनंद भंडारे यांनी मराठी भाषेसाठी केलेले हे 'माहिती अधिकाराचे दिव्य' त्यांच्याच शब्दांत आम्ही क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. ह्या लेखमालेतील हा सहावा आणि अखेरचा लेख ... (पुढे वाचा)
————————————————————————————————————————————------------------------------------------------मार्च २०१३ ते जुलै २०१३ ह्या चार महिन्यांतला माहिती अधिकाराखाली माहिती ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .