राज्यातील मराठी शिक्षणाच्या मनमानी पद्धतीने होत असलेल्या इंग्रजीकरणाच्या विरोधात समविचारी नागरिकांची बैठक दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईतील परळ येथे पार पडली. मराठी अभ्यास केंद्राच्या पालक महासंघाच्या पुढाकाराने पार पडलेल्या ह्या बैठकीत गेल्या काही दिवसांत राज्य शासनाने व मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या मराठीविरोधी निर्णयांचा निषेध करण्यात आला. मराठी शाळांचे सरसकट सेमीइंग्रजीकरण, मराठी माध्यमात प्रथम भाषा मराठी असताना इंग्रजीलाही प्रथम भाषेचा दर्जा देणे तसेच राज्यातील आश्रम शाळांमध्ये मराठीऐवजी इंग्रजी माध्यम सुरू करणे हे वरवर पाहता जनहिताचे निर्णय वाटत असले तरी त्यात ना व्यापक जनहित आहे ना मराठी भाषेचे हित आहे असा बैठकीत झालेल्या चर्चेचा सूर होता. या बैठकीत मराठीप्रेमी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अशा सर्व स्तरांतील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठी अभ्यास केंद्राच्या मराठीप्रेमी पालक महासंघाच्या अध्यक्षा डॉ. वीणा सानेकर यांनी प्रास्ताविकातून बैठकीच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतरच्या बीजभाषणातून डॉ. प्रकाश परब यांनी मराठी शाळांबाबतच्या चुकीच्या शासकीय निर्णयांचे दूरगामी सामाजिक, सांस्कृतिक परिणाम उलगडणारी पार्श्वभूमी सभेसमोर ठेवली. मराठी शाळांचे वाढते सेमीइंग्रजीकरण व आता इंग्रजीला प्रथम भाषेचा दर्जा देणे या निर्णयांमुळे राज्यातील मराठी शिक्षणाचाच नव्हे तर मराठी भाषिक राज्याचाच पाया उखडला जाण्याची भीती ड ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .