स्वायत्त महाविद्यालयांमधे विषयाशी निगडीत गुणवत्ता विकास/कौशल्य विकसन अभ्यासक्रमांचे (श्रेयांकने- २, तास- ३०) आयोजन करण्याची सोय आहे. त्याअंतर्गत आमच्या रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकसन अभ्यासक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. ३० तासांच्या ह्या अभ्यासक्रमांतर्गत परीक्षा/प्रकल्प पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व दोन श्रेयांकने दिली जातील. पदवीला मराठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मराठी बरे असले तरी मराठी टंकलेखन (टाइपिंग) येत नसल्याने किंवा व्यवसायिक वापराच्या दृष्टीने मराठी टंकलेखन कसे करावे हे ठाऊक नसल्याने या मुलांना डिजिटल माध्यमे वापरण्याचा आत्मविश्वास अजिबात नसतो. कारण मराठी डिजिटल माध्यमांचा वापर करायचा तर मराठी टंकलेखन करता येणे ही पहिली अट आहे. हे लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची आखणी केली. त्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या सहयोगाने आयोजित केलेल्या इनस्क्रिप्ट युनिकोड कार्यशाळेचा हा वृत्तांत...साहित्य पाठवण्याचा पत्ताः [email protected]
मराठी प्रथम दुवा: https://bahuvidh.com/marathipratham
संपर्क क्र. – डॉ. प्रकाश परब (९८९२८१६२४०), साधना गोरे (९९८७७७३८०२)
———————————————————————————————————————————————————————————————————
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय आणि मराठी अभ्यास केंद्र यांचा संयुक्त उपक्रम
मराठी प्रथम
डॉ. नीलांबरी कुलकर्णी
2019-09-17 15:00:24
[email protected]
6 वर्षांपूर्वीछान उपक्रम अभिनंदनीय