देशविदेशाचे लोक शिकतायत ऑनलाइन माध्यमातून मराठी!


“आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येक गोष्ट ऑनलाइन शोधली जाते. बातम्यांपासून तंत्रज्ञानापर्यंत सगळ्या गोष्टी आपण ऑनलाइन शिकतो. परदेशी भाषादेखील आपण ऑनलाइन शिकतो. पण मग भारतीय भाषाही ऑनलाइन, घरबसल्या शिकायची सोय का नाही? संस्कृत आणि हिंदीच्या बाबतीत ही सोय बऱ्यापैकी दिसते. मात्र इतर भारतीय भाषांबद्दल अशी स्थिती नाही. हे लक्षात आल्यावर २०१२ साली मी ऑनलाइन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाची सुरुवात केली. पुढे त्याचा विस्तार करत गुजराथी शिकण्याचीही सोय केली. हे सर्व उपक्रम पूर्णपणे मोफत आहेत. केवळ मातृभाषेची सेवा आणि कामातला आनंद या भावनेने मी हे उपक्रम चालवत आहे.” भाषाशिक्षणाच्या आपल्या ऑनलाइन व मोफत उपक्रमाविषयी सांगताहेत, भाषाशिक्षक कौशिक लेले... (अधिक वाचा)

---------------------------------------------------------

महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांत तुम्ही जर्मन, फ्रेंच, चायनीज, जपानी भाषा शिकवणारे शिकवणीवर्ग पाहिले असतील किंवा त्यांच्या जाहिराती पेपरमध्ये बघितल्या असतील. भारतभर असे वर्ग व्यवसायिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पण मराठी, गुजराथी, तमिळ, उडिया इ. भारतीय भाषा शिकवणारे वर्ग इतक्या मोठ्या व्यावसायिक प्रमाणावर तुम्ही पाहिले आहेत का? भारतातच असे वर्ग नाहीत तर परदेशांत तशी सुविधा असण्याची शक्यता किती कमी असेल? असे असले तरी परदेशी व्यक्तीसुद्धा भारतीय भाषा शिकतात. ह्या विदेशी व्यक्तींच्या संपर्कात येणारी भारतीय व्यक्ती त्यांना शिकवते किंवा ते भारतात येऊन एखाद्या विद्यापीठात, AI ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , भाषा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen