भाषेचा लळा लागण्यासाठी नाट्यवाचन!


"नाट्यवाचनानं जेव्हा वेग घेतलेला असतो तेव्हा वर्गातील सगळं वातावरण नाट्यमय होतं. मी वर्गात येताना माझं स्वागतही नाटयपूर्ण ललकारीनं होतं. सई परांजपेंचं ‘अति तिथं माती’ चालू असण्याचा परिणाम वर्गातही दिसत असतो. म्हणजे नाटकाची सुरुवात जशी ‘समशेर बहादूर, चक्रमादित्यमहाराज येत आहेत हो’ अशी होते तशी वर्गातल्या माझ्या प्रवेशालाही ‘सावधान, वर्षाताई, अदितीताई येत आहेत हो, होशियार’ अशा ललकाऱ्या होतात. ‘आज्ञा असावी’, ‘बसा मंडळी’, ‘काय हालहवाल?’ असे संवाद वर्गात नित्याचे होतात. मुलांच्या वापरातील शब्दांवरून मुलं कोणती नाटकं वाचत आहेत, याचा अंदाज येतो. ग्रंथालयातून मुलं आर्वजून वेगवेगळी नाटकं वाचायला नेतात, असं ग्रंथालयाच्या ताई सांगतात.  पुस्तकं विकत आणायला गेल्यावर मुलांचे पाय आपसूकच नाटकांच्या पुस्तकांकडे वळतात, असं पालक सांगतात. या काळात  मुलांच्या वह्यांमध्ये कोणता अभ्यास दिसेलच असं नाही. पण तरीही प्रत्यक्ष अनुभव, अनुकरण आणि निरीक्षण यांतून मुलं बरंच काही शिकत असतात." पुणे येथील अक्षरनंदन शाळेतील शिक्षक अदिती मराठे 'भाषेचा लळा लागण्यासाठी नाट्यवाचन!' ह्या लेखातून सांंगतायत त्यांच्या या अनोख्या उपक्रमाविषयी... (अधिक वाचा)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गेली बरीच वर्ष आमच्या शाळेत चौथीच्या टप्प्यावर ‘नाट्यवाचन’ हा उपक्रम घेतला जातो. सादरीकरणासाठी नाटक निवडल्यानंतर सा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , भाषा , पालकत्व

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen