शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पालक झाले पाहिजे आणि घरी पालकांनी विद्यार्थ्यांचे शिक्षक झाले पाहिजे, असे अनेक शिक्षकतज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांचा निकोप आणि सर्वांगीण विकास होऊ शकेल. मुंबईतील देवनार येथील कुमुद विद्यामंदिर शाळेतील शिक्षक स्मिता वाघचौरे अशाच भूमिकेतून राबवलेल्या ‘मातृदिन’ या उपक्रमाविषयी सांगतायत...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आई माझा गुरू। आई कल्पतरू।
सौख्याचा सागरू। आई माझी।।
श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, याच दिवशी मातृदिन असतो. आपल्या संस्कृतीत आईला देव मानले जाते. मुलांचे संगोपन जन्मदात्री आईच करीत असते. तिचे हे ऋण फेडणे कठीण आहे. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मातृदिन’ या दिनविशेषाचे आयोजन दरवर्षी आमच्या शाळेत केले जाते. शाळेच्या मुख्याध्यापिका जूनमध्येच वर्षभरातील दिनविशेषाचे नियोजन करतात आणि त्याची अंमलबजावणी शिक्षक करतात. यंदा मातृदिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन असे होते की, सर्व मुलांनी ‘श्यामची आई’ पुस्तक विकत घेऊन वाचावे आणि त्यावर आधारित विविध कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम प्रत्येक वर्गाने सादर करावेत. सानेगुरुजींच्या अंतरीची तळमळ जाणून आपल्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .