मराठीप्रेमी पालक महासंमेलन पंधरा दिवसांवर येऊन ठेपलं तरी या संमेलनाचा समन्वयक म्हणून मला संमेलनाची कार्यक्रमपत्रिका पूर्णत्वास नेता आली नाही. दोन दिवसीय संमेलनाची ही रूपरेषा वाचल्यानंतर त्याचं कारणही तुमच्या लक्षात येईल. हा लेख प्रकाशित होईस्तोवर महाराष्ट्रात सगळं स्थिरस्थावर झालेलं असो नि मग लगोलग संमेलनाची कार्यक्रमपत्रिकाही परिपूर्ण होईल.
_____________________________________________________________
मराठी भाषेशी निगडीत विविध प्रश्नांवर कृतिगटांच्या माध्यमातून काम करणारे मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे. ‘मराठी शाळा हा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा कणा आहे’ या धारणेतून गेली पंधरा वर्षे मराठी अभ्यास केंद्र मराठी शाळांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे. मराठी शाळांच्या बाजूने समाज उभा राहावा आणि मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा या उद्देशाने ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. संमेलनाचे हे सलग तिसरे वर्ष असून यंदा १४ व १५ डिसेंबर रोजी परळ येथील आर. एम. भट शाळेत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे दोन दिवसीय महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
१४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. ‘मराठी शाळा जागर फेरी’ आयोजित केली आहे. कामगार मैदान येथून सुरू होणाऱ्या या मराठी शाळांच्या जागरात आर एम भट शाळा, शिरोडकर शाळा, सोशल सर्व्हिस लीग शाळा, नवभारत शाळा, सुदंत्ता शाळा, शिवाजी विद्यालय ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
संजय रत्नपारखी
6 वर्षांपूर्वी'एक संमेलन पालकांसाठी'हा उपक्रम आणि कल्पना छान आहे. उच्च शिक्षणासाठी मराठीचा वावर आणि वापर यावरही लक्ष केंद्रित व्हावे. यासाठी पंचवीस वर्षांपूर्वी विसर्जित झालेल्या महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ अशा संस्थांचे पुनर्जीवन आवश्यक आहे.
6 वर्षांपूर्वी
छान