मराठी - माझी दुसरी आई


गुरुदत्त कामत हे अमराठी गृहस्थ. त्यांना मराठी शिकावीशी वाटली अन् त्यासाठी त्यांनी मराठीचा रीतसर कोर्स तर केलाच, पण ते नियमित मराठी चित्रपट, नाटके आणि मालिकाही पाहतात. मराठी शिकताना त्यांना आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत -  "तुम्हाला तर माहीत आहे, ‘ळ’ अक्षर/उच्चार बऱ्याच भाषांमध्ये आहे. पण आम्ही शंभरदा सोशल मीडियामध्ये वाचतो, मराठी किती समृद्ध आहे आणि ‘ळ’ फक्त मराठीत आढळतो. मग आम्ही ते बिन्धास्त अग्रेषित करतो. जेव्हा मराठी रोमनमध्ये लिहिली जाते तेव्हा कितीदा विनोद उद्भवतो, हास्यास्पद गोष्टी घडतात. 'पणती' लिहा हो, नाही तर तुमच्या मराठी-इंग्रजीमुळे तुम्हाला panties मिळतील. जाता जाता सर्वांस एक कळकळीची विनंती, कृपया मराठी फक्त देवनागरीतच लिहा. सुंदर पण दिसेल आणि गोंधळही होणार नाही."

--------------------------------------------------------------------------------------------------------

‘लाभले आम्हांस भाग्य भेटतो मराठी’ असे मी मा‍झ्या मराठी मित्रांना संबोधित करत असतो. गेल्या चार - पाच वर्षांपासून आमच्या गृह संकुलातील आणि परिसरातील मराठी मित्र मंडळी माझ्या खूप फायद्याची ठरत आहेत. त्यांना प्रश्न विचारून, त्यांच्याशी संवाद साधून माझी मराठी बरीच सुधारली आहे. तरी सुद्धा मला असे वाटते की,  मी तोडकीमोडकी मराठी बोलतो आणि लिहिण्याचे तर बोलूच नका!

जवळपास दहा वर्षांपूर्वी मराठी शिकावी असे मला वाटले. मराठी वृत्तपत्र वाचून शिकेन असे  मला वाटले आणि मी आमच्या पेपरवाल्याला – दगडूला -  मटा टाकायला सांगितले. दोन - तीन दिवस मी ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    किती प्रामाणिक!!

  2. Rdesai

      6 वर्षांपूर्वी

    मस्त अनुभव .

  3. Nishikant

      6 वर्षांपूर्वी

    बालसुलभ प्रामाणिक अनुभव!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen