मराठी भाषेशी निगडीत विविध प्रश्नांवर कृतिगटांच्या माध्यमातून काम करणारे मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे. ‘मराठी शाळा हा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा कणा आहे’ या धारणेतून गेली पंधरा वर्षे मराठी अभ्यास केंद्र मराठी शाळांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे. मराठी शाळांच्या बाजूने समाज उभा राहावा आणि मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा या उद्देशाने ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. संमेलनाचे हे सलग तिसरे वर्ष असून यंदा मराठी अभ्यास केंद्र, गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एम भट हायस्कूल आणि गुरुदक्षिणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सहयोगी संस्था, शाळांच्या एकत्रित प्रयत्नाने सुजाण आणि सजग पालकत्वासाठी १४ व १५ डिसेंबर रोजी परळ येथील आर. एम. भट हायस्कूल येथे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे दोन दिवसीय महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
१४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. ‘मराठी शाळा जागर फेरी’ आयोजित केली आहे. कामगार मैदान येथून सुरू होणाऱ्या या मराठी शाळांच्या जागरात आर एम भट, शिरोडकर, सोशल सर्विस लीग, नवभारत, सुदंत्ता, शिवाजी विद्यालय या गिरणगावातील अग्रगण्य मराठी शाळांमधील जवळपास पाचशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मुंबईच्या प्रथम नागरिक ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
pankajpatil96
6 वर्षांपूर्वीअतिशय स्तुत्य आणि गरजेचा उपक्रम!