fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

कार्यशाळाः- मुलांचे प्रतिसाद

‘भारताच्या इतिहासात एका टप्प्यावर हात व डोके ह्याची फारकत झाली. डोक्याने काम करणाऱ्याने हात वापरणे कमीपणाचे मानले आणि हाताने काम करणाऱ्याने  डोके वापरू नये अशी (जाति) व्यवस्था अस्तित्वात आली. ती मोडायची तर डोके – हात – हृदय या तिन्हींचा समवाय साधणारे शिक्षण हवे.’ हे डॉ. कलबाग यांचे विधान समजून उमजून पुण्याच्या अक्षरनंदन शाळेत विविध कार्यशाळा घेतल्या जातात. या कार्यशाळेविषयीच्या मुलांच्या शब्दांतील या प्रतिक्रिया – 

———————————————————————

 • सुतारकामातले अवघड काम कोणते असे विचारले तर रंधा मारणे असे सांगेन. खरेतर तेसुद्धा अवघड आहे असे नाही, पण त्याचे एक विशिष्ट तंत्र आहे. किती जोर लावायचा हे प्रत्यक्ष काम करूनच कळते.
 • गणपतीच्या दिवशी छान आरास केली होती. सगळे कष्ट, कौशल्य पणाला लावून साकारलेल्या लाकडी पाटावर गणपतीची मूर्ती अलगद ठेवलेली होती. तेव्हा एव्हरेस्ट सर केल्याप्रमाने आनंद झाला होता, अभिमान वाटत होता.
 • कार्यशाळेमुळे मला आता थोडेफार सुतारकाम येते. इलेक्ट्रॉनिक्समुळे मी घरी सायकलचा इलेक्ट्रॉनिक हॉर्न व मागचा दिवा बनवू शकले. इलेक्ट्रीकलमुळे इस्त्री दुरुस्ती, बल्ब बसवणे इ. कामे करू शकते.
 • एके दिवशी खेळताना वर्गाचे दार तुटले. आम्ही दादांना सांगितल्यावर ते म्हणाले, उद्या कर्याशाळेच्या तासाला दुरुस्त करा. मी हातोडी स्क्रू , खिळे इ. साहित्य काढून दिले आणि थोडी मदतही केली. पण दार ज्यांच्याकडून तुटले होते त्यांनी  मुख्य काम केले.
 • इलेक्ट्रीकल मला फारसे आवडायचे नाही. फेज, न्युट्रल वायर, अर्थिंग, चोक, सर्किट… अशा नावांनी माझे डोके चक्रावायचे. पण सुट्टीत एकदा आमच्या घरी संडास, बाथरूम आणि बेसीन यांचे दिवे तीन – चार दिवसांपासून लागत नव्हते. एके दिवशी विचार केला की, आपणच खोलून बघायला काय हरकत आहे? मग धीर करून स्विचबोर्ड उघडला. वायरींचे जंजाळ बघून बावचळलेच. पण थोडे वहीत बघून , थोडे आठवून जमेल तसे करण्याचा प्रयत्न केला आणि तिन्ही दिवे लख्ख लागले. आई -बाबांना सुखद धक्का तर दिलाच, पण ज्या विषयात मी नक्की नापास होणार असे वाटायचे त्याच विषयाने मला खूप आत्मविशवास दिला.
 • आमच्या दोन गटात नकळत स्पर्धा सुरू झाली की कोणाचे काम आधी होते आहे. पटापट रंधा मारता येत असल्याने माझे काम खूप पुढे गेले. पण मध्ये दादांना काम दाखवायला गेले आणि काय! मी उलटया बाजूला रंधा मारला होता. स्पर्धेचे सोडा, पण केलेले कामही वाया गेले होते. मी सर्वांच्या मागे पडले होते, पण काम पूर्ण करूनच मी थांबले.
 • मी पहिल्यांदा खिळा ठोकणार होते. पहिला व्यवस्थित आत गेलाही, पण दुसरा मात्र भयंकर वाकड्या दिशेने गेला. तो बाहेर काढण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण छे! मग दादांना सांगितले, त्यांनी तो दोन सेकंदात ओढून काढला. मलाही शिकवले. मला इतके छान जमले आणि असे वाटले की, सगळयांचे वाकडे खिळे मीच ओढून काढावेत.
 • आम्ही कार्यशाळेत सिमेंटची कुंडी करायला शिकलो. २६ जानेवारीच्या आधी आमच्या लेझीम आम्ही पाॉलिश केल्या.
 • इलेक्ट्रीकलमध्ये आम्ही एकदा दिव्यांची माळ केली होती. सगळयांनी एकेक दिवा जोडला होता. मिळून केलेली माळ पूर्ण होऊन दिवे चालू केल्यावर टाळया वाजवल्या.
 • सुरुवातीला रंधा सरळ मारणे मला इतके अवघड वाटायचे! रंधा मारता मारता हात दुखून यायचे. सुतारकामाचे दादा इतक्या सहजतेने रंधा मारायचे की लाकडाचा पूर्ण छिलका निघायचा. मला याचे फार आश्चर्य वाटायचे. पूर्ण वर्षभर रंधा मारून वर्षाच्या शेवटी मलाही उत्तम रंधा मारता यायला लागला. वर्षाच्या सुरुवातीचे काम पाहता मला त्यात प्रचंड फरक जाणवतो. शेवटी शेवटी सफाई आलेली दिसते.
 • लाकूड कापताना जास्त ताकद लावून उपयोग नसतो, तर योग्य प्रकारे करवत पकडल्यावर लाकूड सहज कापले जाते, हे सुतारदादांनी अगदीच मस्त सांगितले.
 • आसपासच्या मित्रांमध्ये मीच तेवढा एक नवीन विषय शिकत असल्याने अंगावर मांस आल्यासारखे झाले. त्याच बरोबर कामगारांच्या जीवनाची तोंडओळख झाली. नवीन निर्मितीचा आनंद मिळाला. मनातील श्रमप्रतिष्ठा वाढली.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

 1. खूप छान

 2. खूपच उद्बोधक

 3. Where is this school exactly.. pl give me the address and contact details of the concern person and the school viz. phone numbers, fax number, email id, whatsapp nos. etc.

  1. अक्षरनंदन शाळेच्या विद्या पटवर्धन ह्या संस्थेच्या सचिव आहेत, त्यांचा नं. ९५४५४१४१४८

Leave a Reply

Close Menu