लंडन येथे टिचर्स डिप्लोमा करून पुण्यात परतलेल्या आचार्य अत्रे यांनी कॅम्प एज्युकेशन सोसायटी शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. शालेय विद्यार्थ्यांवर उच्च मानवी मूल्यांचे संस्कार व्हावेत, त्यांची मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून अत्रे यांनी पूर्वप्राथमिक ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १९३०च्या दशकात नवयुग वाचनमाला सुरू केली. ब्रिटिश राजवटीमध्ये सरकारी क्रमिक पुस्तके रूक्ष होती. त्या पुस्तकांमधून मराठी भाषा आणि साहित्याकडे फारसे लक्ष जात नव्हते. साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शांता शेळके अशा ज्येष्ठ साहित्यिकांनी नवयुग वाचनमालेसाठी लेखन केले होते. दोन-तीन पिढ्या घडविणाऱ्या नवयुग वाचनमालेचा तीन दशके मराठी समाजमनावर प्रभाव होता. या वाचनमालेतील अत्र्यांच्या बालसाहित्याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेतील डॉ. वीणा सानेकर यांचा हा पहिला लेख.
----------------------------------------------------------------------------------------
पाठ्यपुस्तकांनी मुलांची भाषा घडवण्याचे काम केले पाहिजे याबाबत कुणाचेच दुमत नाही. प्रश्न हा आहे की हे काम ती कितपत करतात? आचार्य अत्रे अष्टपैलू म्हणून सर्वज्ञात आहेत. त्यांचा 'शिक्षक 'हा पैलू किती सजग होता याची ठळक साक्ष अत्र्यांची ‘नवयुग’ वाचनमाला देते. पदवीधर झाल्यानंतर अत्रे शिक्षकी पेशाकडे वळले ते साधारणपणे १९१९ सालच्या आसपास. नंतर ते ज्या शाळेचे मुख्याध्यापक झाले, त्या पुण्याच्या कॅम्प एज्युके ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
साधना गोरे
5 वर्षांपूर्वीनवयुग वाचनमालेअंतर्गत लेख गेल्या वर्षी दोन खंडात प्रकाशित झाले आहेत.
कविंद्र साळुंके
5 वर्षांपूर्वीनवयुग वाचनमालेशिवाय सुभाष, मंगल, अरूण अशा इतरही चांगल्या वाचनमाला त्याकाळी होत्या असे ऐकले आहे. पण आमच्या वेळी बालभारतीची पुस्तके होती. आता या सर्व वाचनमाला कोणत्या संकेतस्थळावर किंवा ग्रंथालयात वाचायला मिळतील का?
विट्ठल बा माने
5 वर्षांपूर्वीशिक्षण विचारविषयक नव्याजुन्या पुस्तकांची माहिती मिळाली .यादी नक्कीच उपयुक्त आहे..चांगले दर्जेदार लेख निश्चितच वाचावयास मिळतील ही अपेक्षा
ajitpatankar
5 वर्षांपूर्वीजुन्या आठवणी जाग्या झाल्या... नवयुग वाचनमाला मधील “दिनूचे बील” हे गोष्ट वाचून रडू कोसळलं होतं... (आजही भारावून जातो)... मला आठवतंय, पाचवी नंतर सुभाष वाचनमाला देखील होती.. त्यावरील एलिफंटा किंवा अजिंठा येथील लेण्याचे चित्र अजून आठवतंय... पुरवणी वाचन म्हणून ही पुस्तके गिरगावातील आमच्या चिकित्सक समूह शाळेत होती...
rsrajurkar
5 वर्षांपूर्वीप्रस्तुत लेख वाचून खूप छान वाटले. माझी मुलं मराठी शाळेत आहेत . शाळा भाषेचा उत्तम रीतीने उपयोग करून मुलांना घडविण्याचे कार्य करीत आहे.
Anand G Mayekar
5 वर्षांपूर्वीRespected Dr. Sanskar Mam, Good Evening. After reading your above article, realised the importance of practical educational system. It teaches , Developing students in versatile angles should be motive and aim of every school. Ni doubt text books are important, but it gives only theoretical knowledge to students. You have mentioned about very senior (not only by age, but by experience, knowledge and versatility) eminent Personality, Shri P.K Atre, who changed the face of Camp Educational Society, by introducing and practicing Navayug Vachan mala Project, which helped a lot to students to learn basic and essential for life of students. You have beautifully narrated by giving examples of selected articles of this VACHAN MALA, e.g. 1. Clock & it's needles . Fun out of it, is elaborated smoothly in playing mood. e.g 2 Story of Donkey: It resembles the person who tolerates, insults, bad remarks of society even after serving religiously, and with honesty. It is a good lesson for all of us how to deal with cunning and shrood people around us. E.g 3. Drop of rain water or grass leaf : This will definitely develop and cultivate creative imaginary talent of student. It is soothing feeling to have such imagination to get rid of depression. E.g.4 : Story of King's son : This is the last intelligent example of teaching students about respecting people, respecting nature and respecting self reliance. All the above examples are very important to imbibe on student's mind so that they will be true citizen and real Human being. Thanks Mam, for presenting this valuable article and enrich our knowledge and brain.
विजया चौहान
5 वर्षांपूर्वीवीणा, या कोरोना सक्तीच्या आरामाच्या काळात अत्यंत सुंदर आठवणी जाग्या झाल्या, स्वत:त्यात न दिसता अन्य अनेक गोष्टी, शिक्षक, शाळा, मैत्रिणी खूप खूप आठवत गेले. मुख्यतः आता जाणवते की आताची पुस्तके, शिकवणे, शिक्षक, सारे कसे मिळमिळीत आणि पातळ होत गेले आहे। मराठी भाषेसाठी आता मराठी शाळांना प्रथम सारख्या बाहेरच्या संस्थांची गरज भासू लागते याचा खूप विषाद वाटतो.तुझ्या लेखन बालपणीच परत आणले काही प्रमाणात।पुढील लेखांची वाट पाहते। विजया.
5 वर्षांपूर्वी
उत्कृष्ट !शिक्षक नावाचा पैलू सजग असेल तरच मुलांची 'भाषा' घडते.हाउपक्रम पुण्याच्या शाळाशाळात पोहचला होता. ७०च्या दशकात आम्ही याचा आनंद घेतलाय.आठवणी उजळल्या बद्दल आभार !सजग शिक्षकांनी आजही असा नवा विचार करायला हवा धन्यवाद सानेकर मॅडम!