fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

शिक्षणप्रेमींसाठी पुस्तकयादी

शिक्षक, पालक आणि शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचली पाहिजेत अशा शिक्षणविषयक पुस्तकांची यादी करण्याचे ‘मराठी प्रथम’नं ठरवलं आणि आज जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्तानं  ती प्रकाशित करत आहोत. अशा पुस्तकांची यादी एखाद्या व्यक्तीने केलेली असेल किंवा संस्थेने, तिला मर्यादा असणारच. या यादीत आणखी भर घालण्यासाठीच ती आपल्यापर्यंत पोहचवावी असे वाटले.

उत्तम अभिनेता/अभिनेत्री शारीर सौंदर्य, देहबोली, सार्वजनिक वावर आणि कसदार अभिनय इ. बाबत किती सजग असतो/असते हे आपल्याला माहीत आहे आणि तसं असणं स्वाभाविकही आहे. कारण शारीर सौंदर्य आणि अभिनय हेच त्याचं भांडवल असतं. अर्थात उत्तम नटाच्या या गुणवैशिष्ट्यांबाबत मतभिन्नता असू शकते. पण सांगायचा मुद्दा हा की आपल्या क्षेत्रातील नवनव्या गोष्टी आत्मसात केल्या नाहीत तर माणूस तग घरू शकत नाही. शिक्षकाचं भांडवल ज्ञान आणि ते देण्याच्या पद्धती हे असेल तर त्याने त्याबाबत सजग असणं अपरिहार्य ठरतं. सर्वच शिक्षक आपापल्या शाळेत उपक्रम राबवतच असतात. पण कधी कधी वर्षानुवर्ष तेच ते उपक्रम राबवल्याने शिक्षकांमध्ये एक प्रकारचं साचलेपण येऊ शकतं अन् मग केवळ उपक्रमासाठी उपक्रम राबवले जाण्याची परंपरा सुरू होते. असं झालं की शिक्षकाचं त्या उपक्रमातून मन तर उडालेलं असतं, पण नवं काही सुचत नसल्याने उपक्रमांची परंपरा सुरूच राहण्याचा धोका वाढत जातो. ज्या उपक्रमात शिक्षक पूर्णपणे गुंतलेला नसतो असे उपक्रम मुलांपर्यंतही खऱ्या अर्थाने पोचत नाहीत. यातूनच मग अभ्यासक्रम आणि उपक्रम यांची फारकत व्हायला सुरुवात होते. उपक्रम राबवताना अभ्यासक्रम शिकवायला वेळ कमी पडतोय असं वाटायला लागतं. अशावेळी ज्यांनी संबंध अभ्यासक्रमच नावीन्यपूर्ण उपक्रमांशी जोडून मुलांपर्यंत पोहचवला आहे, अशा शाळांविषयी वाचायला मिळालं तर उपक्रमशील शिक्षक अधिक प्रयोगशील होण्यास मदत होऊ शकेल.

प्रमाणबद्ध देहयष्ठी, शारीर सौंदर्य यांवर मात करू शकेल असा अभिनय नटाकडे असेल तर  प्रेक्षकांना त्याची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. पण त्यासाठी  नटाला कसदार अभिनयाची तंत्रं आत्मसात करावी लागतात. असं नवं काही आत्मसात केल्याशिवाय नट प्रेक्षकांना नवं काही देऊ शकत नाही. मग ज्या व्यवसायात सतत नव्या गोष्टीत रमू पाहणाऱ्या मुलांशी सतत संबंध येतो, तिथं नावीन्याचा किती ध्यास घेतला पाहिजे! शिक्षक आपल्या डि. एड. – बी.एडच्या प्रशिक्षण काळात शिक्षणशास्त्रातील काही पद्धती, तंत्रे शिकत असला तरी सतत बदलू पाहणाऱ्या काळासाठी ही तंत्रे, पद्धती पुरेशी पडू शकत नाहीत. शिक्षकाने आपल्या व्यवसायाशी संबंधित संशोधने, अध्यापनपद्धती, तंत्रे यांचा सतत मागोवा घेऊन  ती आपल्या वर्गात राबवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं तर वर्गातला शिक्षकांचा आणि मुलांचा वावर आनंददायी होईल. या यादीतील पुस्तकं असा आनंददायी शिक्षणाविषयी आपल्याशी संवाद साधतात.

या यादीतील बरीचशी पुस्तके ज्यांनी शिक्षणात प्रयोग केले आहेत अशा व्यक्तींची आहेत. काही पुस्तकं अनुभवकथन सांगणारी आहेत, तर काही अध्यापनपद्धती, तंत्रे यांवर भर देणारी आहेत. काही शिक्षणविषयक तात्त्विक मांडणी करणारी, शिक्षणाची ध्येयधोरणे यांविषयी मुळातून विचार करायला लावणारी आहेत. यामध्ये गांधीजींच्या बुनियादी शिक्षणाची माहिती देणारी पुस्तके आहेत तशी विनोबा, जे. कृष्णमूर्ती, ओशो, अनिल सद्गोपाल यांनी शिक्षणाविषयी केलेली तात्त्विक मांडणी आपल्यासमोर साकारणारी पुस्तकेही आहेत. आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण लक्षणीय आहे. अनेक संस्था आणि एकांड्या शिलेदारांनी यावर काम केलेलं आहे, करतायत. त्यांनी मांडलेल्या निरीक्षणांतून  आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर कदाचित मात करता येऊ शकेल.

टाकाऊ गोष्टीतून विज्ञान खेळणी बनवणारे अरविंद गुप्ता, विज्ञान – भाषा यांविषयी मूलभूत विचार मांडणारे कृष्णकुमार यांची अनुवादित पुस्तके या यादीत आहेत. विविध देशांतील प्रयोगशील शाळांची माहिती देणारी अनुवादित पुस्तके यात आहेत. या यादीतील काही पुस्तकांच्या पीडीएफ इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. http://www.arvindguptatoys.com/  या संकेतस्थळावर अरविंद गुप्ता आणि इतरांची काही पुस्तके, लेख वाचता येतील. शिवाय अरविंद गुप्ता यांच्या विज्ञान खेळणी बनवण्याच्या काही व्हिडीओज् https://www.youtube.com/user/arvindguptatoys यूट्युबच्या या लिंकवर आपल्याला पाहता येईल. रोजच्या वापरातील वस्तूंमधील गणित आणि विज्ञान या विषयांबद्दल ही माहिती आपल्याला थक्क केल्याशिवाय राहत नाही. https://epustakalay.com/marathi/ या संकेतस्थळावर बरीच जुनी मराठी पुस्तके, कोश उपलब्ध आहेत. यात काही चांगलं बालसाहित्यही आहे. या साहित्याचा आपल्याला वर्गात शिकवताना उपयोग होऊ शकेल. आमादेर शांतिनिकेतन, करून तर पाहा, ग – गणिताचा, दिवास्वप्न, कोसबाडच्या टेकडीवरून मुलांची भाषा आणि शिक्षक, मुले नापास का होतात?, विश्व – आपलं कुटुंब, शासन समाज आणि शिक्षण, शिकवण्यायोग्य काय आहे?, सुपरहिरो – अरविंद गुप्ता, सोपी विज्ञान खेळणी ही पुस्तके वरील संकेतस्थळावर पीडीएफच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. https://www.youtube.com/watch?v=tYARqEp0Nbg यूट्युबवरील या लघुपटातून विज्ञान पाबळ आश्रमाची सविस्तर माहिती मिळते. अनिल सद्गोपाल यांची बरीचशी व्याख्याने यूट्यूबवर उपलब्ध आहेत.

ही पुस्तकं केवळ शिक्षकांना उपयोगी आहेत असं नव्हे, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मुळातून विचार करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ती आहेत. आपण शिक्षक असू, पालक असू किंवा शिक्षणाविषयी आस्था असणारे शिक्षणप्रेमी असू प्रत्येकाला या पुस्तकांतून नवं काही गवसेल. एखाद्या राष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडविण्याची ताकद तिथल्या शिक्षणव्यवस्थेत असते, हे विधान कुणीही मान्यच करेल. पण ते घडवत असताना आपण पुन्हा पुन्हा चाकाचा शोध लावत नाही आहोत ना, हे कळण्यासाठीही ही पुस्तकं वाचायला हवीत.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शिक्षणविषयक पुस्तकांची ही यादी परिपूर्ण नाही. या यादीत नसलेली आपल्याला माहीत असलेली पुस्तके आम्हाला कळवल्यास ही यादी अधिक परिपूर्णतेकडे नेता येईल. महत्त्वाचं म्हणजे अशा शिक्षणविषयक पुस्तकांवरील परीक्षण लिहून आम्हाला पाठवल्यास ‘मराठी प्रथम’वर ते प्रकाशित करण्यात येईल.

क्र. पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव प्रकाशक प्रकाशन वर्ष
शिक्षण – विचार विनोबा भावे परमधाम
शिक्षणः तत्त्व आणि व्यवहार विनोबा भावे परमधाम
म. गांधीजींचे शैक्षणिक विचार डॉ. बाळ पदवाड श्रीमंगेश
शिक्षा में क्रांती ओशो
शिक्षण – संवाद जे. कृष्णमूर्ती अनु. दिवाकर घैसास, ग.य. दीक्षित, चंद्रकांत भोसेकर साकेत
शिक्षणः जीवनरहस्य जे. कृष्णमूर्ती अनु. मंगेश पाडगावकर चंद्रकला
शाळा तुम्हाला जीवनासाठी तयार करते का? जे. कृष्णमूर्ती अनु. डॉ. शशिकला कर्डिले कृष्णमूर्ती फाऊंडेशन, इंडिया
पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी जे. कृष्णमूर्ती अनु. दिवाकर घैसास, ग.य. दीक्षित कृष्णमूर्ती फाऊंडेशन, इंडिया
भावी जीवन जे. कृष्णमूर्ती अनु. दिवाकर घैसास, ग.य. दीक्षित, प्र. ज. देशपांडे
१० या गोष्टींचा विचार करा जे. कृष्णमूर्ती अनु. दिवाकर घैसास साकेत
११ भावना प्रबळ असू द्या, त्यांचं भय बाळगू नका जे. कृष्णमूर्ती अनु. डॉ. शशिकला कर्डिले कृष्णमूर्ती फाऊंडेशन, इंडिया
१२ तुमच्यातील सुप्त प्रतिभा ओळखा जे. कृष्णमूर्ती अनु. डॉ. शशिकला कर्डिले कृष्णमूर्ती फाऊंडेशन, इंडिया
१३ कंटाळवाणेपणा आणि करमणुकीचा उद्योगधंदा जे. कृष्णमूर्ती अनु. डॉ. शशिकला कर्डिले कृष्णमूर्ती फाऊंडेशन, इंडिया
१४ कोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ ऋचा १९८०
१५ ताराबाई मोडक (चरित्र) ललितकला शुक्ल ललितकला
१६ पद्मभूषण ताराबाई मोडक जन्मशताब्दी स्मृतिग्रंथ नूतन बालशिक्षण संघ
१७ बाल – शिक्षण विचार नूतन बालशिक्षण संघ
१८ बालवाडी कशी चालवावी? अनुताई वाघ नूतन बालशिक्षण संघ
१९ सहजशिक्षण अनुताई वाघ
२० शिक्षा में बदलाव का सवाल अनिल सद्गोपाल ग्रंथ शिल्पी २०००
२१ प्रवास ध्यासाचा…आंनद सृजनाचा लीला पाटील उन्मेष प्रकाशन
२२ शिक्षणातील ओअसिस लीला पाटील उन्मेष प्रकाशन
२३ शिक्षण घेता – देता लीला पाटील उन्मेष प्रकाशन
२४ ऐलमा पैलमा शिक्षण देवा लीला पाटील उन्मेष प्रकाशन
२५ बालकहक्क – मुलंच जेव्हा बोलू लागतात…  लीला पाटील ग्रंथाली २००६
२६ अर्थपूर्ण आनंदशिक्षणासाठी लीला पाटील उन्मेष प्रकाशन
२७ शिक्षणातील लावण्य लीला पाटील ग्रंथाली
२८ लिहिणं मुलांचं शिकवणं शिक्षकांचं लीला पाटील मॅजेस्टिक
२९ मुलींचे शिक्षण डॉ. लीला पाटील साकेत
३० मुलांचे शिक्षणः पालक व शासन प्रा. रमेश पानसे डायमंड
३१ शिक्षणः आनंदक्षण प्रा. रमेश पानसे ग्रंथाली
३२ नवे बालशिक्षण प्रा. रमेश पानसे ग्राममंगल
३३ बहुविध बुद्धिमत्तांचा विचार (८) प्रा. रमेश पानसे बालशिक्षण संशोधन व विकास केंद्र
३४ रचनावादी शिक्षण प्रा. रमेश पानसे ग्राममंगल २०१०
३५ अल्फी कोहन यांचे काही लेख (१५) प्रा. रमेश पानसे बालशिक्षण संशोधन व विकास केंद्र
३६ लहान मुलांच्या शाळांसाठी प्रा. रमेश पानसे ग्राममंगल
३७ लहान मुलांच्या शिक्षकांसाठी प्रा. रमेश पानसे ग्राममंगल
३८ भाषाग्रहण व भाषाशिक्षण प्रा. रमेश पानसे ग्रंथाली
३९ कर्ता – करविता प्रा. रमेश पानसे, अनिता देशमुख, राज्यश्री क्षीरसागर भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी
४० निळे आकाश, हिरवी झाडे, काळी माती प्रा. रमेश पानसे ग्राममंगल
४१ शिक्षण, शिक्षक व अभ्यासक्रम प्रा. रमेश पानसे राज्य मराठी विकास संस्था
४२ आजचे शिक्षणः उद्याचे जीवन प्रा. रमेश पानसे डायमंड २००६
४३ नयी तालीमः गांधीप्रणित शिक्षणविषयक प्रयोगांचा इतिहास प्रा. रमेश पानसे डायमंड
४४ लहान मुलांच्या पालकांसाठी प्रा. रमेश पानसे ग्राममंगल
४५ शिक्षणः विचारमंथन प्रा. रमेश पानसे डायमंड
४६ शिक्षण, शिक्षक व अभ्यासक्रम वासुदेव बळवंत पटवर्धन राज्य मराठी विकास संस्था २०००
४७ मुलांचे सृजनात्मक लिखाण मंजिरी निमकर ज्योत्स्ना प्रकाशन २००९
४८ शिक्षणाप्रवाहाच्या उगमापाशी सुचिता पडळकर मनोविकास प्रकाशन
४९ शाळा एक मजा अरुण ठाकूर आनंद निकेतन
५० सहजशिक्षणाची प्रयोगशाळा आनंदनिकेतन आनंदनिकेतन २०१२
५१ निर्मितीचे आकाश – ८०० शालेय प्रकल्प रेणू दांडेकर मनोविकास
५२ कणवू रेणू दांडेकर सह्याद्री
५३ खेळातून भाषाविकास रेणू दांडेकर अनुश्री
५४ शाळाभेट नामदेव माळी साधना
५५ आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं संपा. नामदेव माळी साधना
५६ प्रोजक्ट फंडा हेमंत लागवणकर मनोविकास
५७ ६१ प्रकल्पातून पर्यावरण शिक्षण हेमंत लागवणकर, प्रिया लागवणकर अभिषेक टाईपसेटर्स आणि पब्लिशर्स
५८ अक्षरमुद्रा अक्षरनंदन शाळा, पुणे अक्षरनंदन शाळा, पुणे २०१७
५९ शिक्षणकोंडी टीम आशा रोहन २०१९
६० सागरशाळा देवेंद्र कांदोळकर मनोविकास २००९
६१ कवाडे उघडताच प्रतिभा भराडे साधना
६२ आपली भाषा, आपल्या शाळा, आपली मुलं संपा – डॉ. वीणा सानेकर मराठी अभ्यास केंद्र २०१७
६३ माझी काटेमुंढरीची शाळा गो. ना. मुनघाटे साधना
६४ कुडाळकरांची शाळा चंद्रकांत भंडारी अक्षर मानव
६५ नंदादीप – आठवणीतील साठवणी अरविंद वैद्य
६६ मुलांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क ० २००९ चा कायदा – एक धूळफेक अरविंद वैद्य लोकवाङ्‍मयगृह
६७ एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा नरेंद्र लांजेवार साकेत
६८ शिक्षणावर बोलू काही… नरेंद्र लांजेवार ग्रंथाली २०१५
६९ न पेटलेले दिवे राजा शिरगुप्पे साधना
७० प्रकाशाच्या उंबरठ्यावर भाऊ गावंडे ग्रंथाली
७१ का कराचं शिकून लक्ष्मण माने ग्रंथाली
७२ लोकशाही आणि शिक्षण डॉ. जनार्दन वाघमारे पद्मगंधा
७३ बदलते शिक्षण – स्वरूप आणि समस्या डॉ. जनार्दन वाघमारे पद्मगंधा
७४ लिहावे नेटके (४ संच) माधुरी पुरंदरे ज्योत्स्ना प्रकाशन
७५ बखर शिक्षणाची हेरंब कुलकर्णी राजहंस
७६ जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स हेरंब कुलकर्णी मनोविकास
७७ शाळा आहे शिक्षण नाही हेरंब कुलकर्णी ग्रंथाली
७८ परीक्षेला पर्याय काय? हेरंब कुलकर्णी मनोविकास
७९ माझी शिक्षण परिक्रमा हेरंब कुलकर्णी राजहंस २०१८
८० आमच्या शिक्षणाचं काय? हेरंब कुलकर्णी मनोविकास २०१५
८१ शिक्षकांसाठी सानेगुरुजी हेरंब कुलकर्णी मनोविकास २०१७
८२ नवे शिक्षण नवे शिक्षक डॉ. सुनीलकुमार लवटे अक्षर दालन
८३ शिक्षण संपा. प्रा. विलास रणसुभे लोकवाङ्‍मय गृह २००५
८४ छोटी खेळणी मोठे विज्ञान अरविंद गुप्ता मनोविकास
८५ सोपी विज्ञान खेळणी अरविंद गुप्ता मनोविकास
८६ कचऱ्यातून चमत्कार अरविंद गुप्ता मनोविकास
८७ ग गणिताचा – गणितातील गमती अरविंद गुप्ता मनोविकास
८८ खेळ विज्ञानाचे – कृती आणि कौशल्य अरविंद गुप्ता मनोविकास
८९ कचऱ्यातून कमाल अरविंद गुप्ता मनोविकास
९० टाकाऊतून शिकाऊ अरविंद गुप्ता मनोविकास
९१ खेळण्यांचा खजिना अरविंद गुप्ता मनोविकास
९२ काडेपेटी आणि इतर विज्ञान खेळणी अरविंद गुप्ता मनोविकास
९३ Hands on करून पाहा अरविंद गुप्ता मनोविकास
९४ उद्योगी व्हा अरविंद गुप्ता मनोविकास
९५ छोटी खेळणी अरविंद गुप्ता नॅशनल बुक ट्रस्ट
९६ आनंदाने शिकण्याच्या दिशेने शुभदा जोशी खेळघर
९७ वेध शिक्षणाच्या हक्काचा गिरीश सामंत ग्रंथाली
९८ द्वि-वर्ण शिक्षण व्यवस्था कॉ. गोविंद पानसरे लोकवाङ्‍मय गृह २०१०
९९ दिवास्वप्न गिजूभाई बधेका इंडियन इन्सिट्यूट ऑव्ह एज्युकेशन
१०० प्रिय बाई – बार्बियानाची शाळा अनु. सुधा कुलकर्णी मनोविकास
१०१ आमादेर शांतिनिकेतन शिवाना अनु. आशा साठे कजा कजा मरू
१०२ तोत्तोचान तेत्सुको  कुरोयानागी अनु. चेतना सरदेशमुख – गोसावी नॅशनल बुक ट्रस्ट
१०३ टू सर विथ लव्ह ई. आर. ब्रेथवेट अनु. लीना सोहोनी मेहता पब्लिशिंग हाऊस
१०४ नीलची शाळा – समरहिल ए. एस. नील अनु. हेमलता होनवाड, सुजाता देशमुख राजहंस
१०५ टीचर सिल्व्हिय अश्टन वॉर्नर अनु. अरुण ठाकूर मनोविकास २००७
१०६ शिकवण्यायोग्य काय आहे? कृष्णकुमार अनु. अरुण ठाकूर, कमला सोहोनी ज्योत्स्ना
१०७ मुलांची भाषा आणि शिक्षक कृष्णकुमार अनु. वर्षा सहस्रबुद्धे
१०८ शासन, समाज आणि शिक्षण कृष्णकुमार अनु. गणेश विसपुते लोकवाङ्‍मय गृह
१०९ ‘विश्व’ आपलं कुटुंब कृष्णकुमार अनु. शोभा भागवत उन्मेष
११० खऱ्या शिक्षणाच्या शोधात – जीवनमूल्य उंचावणाऱ्या शाळांविषयी डेव्हिड ग्रिबल अनु. वृंदा चापेकर मनोविकास २०१४
१११ जिथे मुलांना पंख फुटतात – सडबरी व्हॅली स्कूल डॅनियल ग्रीनबर्ग अनु. नीलांबरी जोशी मनोविकास २०१८
११२ प्रिय मुख्याध्यापक शंकर मुसाफिर अनु. डॉ. प्रदीप गोटुस्कर मनोविकास २०१५
११३ माझे विश्व मुलांचे वासिली सुखोम्लिन्स्की अनु. श्रीनिवास कोर्लेकर प्रगती
११४ शर्यत शिक्षणाची व्ही. रघुनाथन रोहन
११५ विज्ञान शिक्षण – नव्या वाटा हेमचंद्र प्रधान ग्रंथाली २००४
११६ शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक पद्मजा फाटक मौज १९८१

– मराठी प्रथम टीम

९९८७७७३८०२

marathipratham@gmail.com

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 14 Comments

  1. Great . Thanks.

  2. आपले किती आभार मानावेत हेच कळत नाही.आपण हा पुस्तकांचा खजिना आमच्यासारख्या ग्रामीण भागातील शिक्षकांना सहज उपलब्ध करून दिला,याबद्दल आपले खूप खूप आभार!धन्यवाद!!💐💐

  3. खूप छान पुस्तकांचा खजिना! स्तुत्य उपक्रम !नक्की वाचू.

Leave a Reply

Close Menu