सिग्नल शाळा – नव्या युगाचे पसायदान (भाग – १)

मुलाला कोणत्या बोर्डाच्या शाळेत घालायचं याविषयी विचार करणारा पालकवर्ग आपल्या समाजात आहे, तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या स्थलांतरामुळे मुलांना शाळेतच पाठवू न शकणारा पालकवर्गही आहे. आज अनेक स्वयंसेवी संस्था अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातूनच ग्रामीण भागातील  वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार यांची मुलं शिकती होऊ लागलेली दिसतायत, तर शहरांमध्ये कचरावेचकांच्या मुलांसाठी, रेल्वेत आणि इतरत्र वस्तूविक्री करण्याऱ्या मुलांसाठी अशा शाळा भरताना दिसतायत. ठाण्यातल्या तीन हात नाक्याच्या पुलाखाली कंटेनेरमध्ये अशीच एक सिग्नल शाळा भरते. सिग्नलला उभी राहून फुलं, पिशव्या, पुस्तकं इ. वस्तूंची विक्री करणारी मुलं या शाळेत शिकतायत. या शाळेतील शिक्षिका आरती पवार – परब ‘सिग्नल शाळा’ सदरातून या मुलांना शिकतं करण्याच्या प्रवासातील अनुभव आपल्यासमोर उलगडणार आहेत. त्या अनुभवमालिकेतील हा पहिला लेख –

——————————————-

जगाच्‍या प्रारंभापासून ते अंतापर्यंत एक गोष्‍ट निरंतर होत राहणार आहे, ती म्‍हणजे स्‍थलांतरण.  अश्‍मयुगापासुन ते सायबर युगापर्यंत आणि भविष्‍यात येऊ घातलेल्या युगातही एक धागा समान असणार आहे, तो स्‍थलांतरणाचा. स्‍वातंत्र्याच्‍या २४२ व्‍या वर्षी ‘स्‍पिरीट ऑफ इनोव्‍हेशन’चा नारा देणारी अमेरिका स्‍थलांतरितांच्‍या कर्तृत्‍वाने मोठी झाली. सिग्‍नल शाळा देखील स्‍थलांतरितांच्‍या प्रश्‍नांना शिक्षणाच्‍या माध्‍यतातून उत्‍तर देण्‍याचे काम करीत आहे. प्रत्‍येक कोपऱ्यात कुणीतरी स्‍थानिक आणि कुणीतरी परप्रांतीय राहणारच आहे हे त्रिकालबाधित सत्‍य आहे. स्थलांतरण अटळ आहे हे आजपर्यंतच्‍या इतिहासाच्‍या नोंदींनी सिद्ध झाले आहे आणि स्‍थलांतरितांमुळे जग अधिक सुंदर झाले आहे असेल तर त्‍यांच्‍या प्रश्‍नांकडे देखील तितक्याच संवेदनशीलतेने पाहता यायला हवे.

हेही वाचाः-

हे बंध रेशमाचे!

शिवराय आणि बालमावळे

ज्यांच्‍याकडे क्रयशक्‍ती आहे अशांचे स्‍थलांतरण वादाचा मुद्दा ठरत नाही, पण क्रयशक्‍ती नसलेल्‍या स्‍थलांतरितांचे स्‍थलांतरण विकास-पूरक करण्यासाठी स्‍थलांतरितांच्‍या प्रश्‍नांबाबत ठोस धोरण ठरविण्‍याची वेळ आता आली आहे. जगाच्‍या कल्‍याणासाठी स्‍थलांतरितांचे प्रश्‍न जिव्‍हाळ्याने सोडविण्‍याची गरज आहे. ‘Poverty anywhere is threat

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

 1. sangijosh

  लेख खूप महत्त्वाचा आहे पुढील भाग वाचायला उत्सुक आहे. आरती पवार परबांचा प्रवास आणि अनुभव जाणून घ्यायचे आहेत.

 2. Rdesai

  अप्रतिम प्रकल्प !पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा

  1. Anonymous

   सुंदर लेख👌👍

Leave a Reply